google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : दगडफेकीत भगवान बुद्धांच्या मूर्तीची तोडफोड

Breaking News

सोलापूर : दगडफेकीत भगवान बुद्धांच्या मूर्तीची तोडफोड

 सोलापूर : दगडफेकीत भगवान बुद्धांच्या मूर्तीची तोडफोड



सोलापूर : पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून दोन गटात वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले, या दगडफेकीत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची तोडफोड झाली आहे. तसेच आंबेडकर जयंती निमित्त तयार करण्यात आलेले डिजिटल फाटले आहे यासह जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी लोधी समाजातील सुमारे 10 जणांवर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उमेश श्रावण जेटीथोर वय ४२ वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार महाराणा प्रताप नगर झोपडपट्टी कुमठा नाका, यांनी फिर्याद दिली आहे. 


१) सुरेश किसनसिंग चौधरी, २) राज चौधरी ३) शितल चौधरी ४) शुभम कय्यावाले ५) निलेश बहाणपूरे ६) लखन बंबय्यवाले ७) इतर ५ ते १० लोक रा. सर्व जण महाराणा प्रताप नगर झोपडपट्टी, यांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा ६७३/२०२१ भा.द.वि.क. १४३,३३६४२७,५०४,५०६ सह.अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ या सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ३(१)(r). ३(१)(s). ३(१)(१) ३ (२) (va).3(1/1), 3(2)(va). प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.


दि. ३०/१२/२०२१ रोजी फिर्यादीचा मेव्हणा विशाल याने दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून दि. ३१/१२/२०२१ रोजीचे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुरेश चौधरी, राज चौधरी, शितल चौधरी, शुभम कय्यावाले, निलेश बन्हाणपूरे, लखन बंबय्यावाले व इतर ५ से १० लोकांनी मिळून फिर्यादी यांचा मेव्हणा विशाल यास छिनाल के कल काय को मेरे नाम पे कंम्पलेट दिया, धेड के, तुम्हारे को यहा रहनेका है क्या नही अशी जातीवाचाक शिवीगाळ करून दगडफेक केली आहे. 



दगडफेकीमध्ये एक दगड चुकून फिर्यादीच्या घरासमोर असलेल्या सार्वजनिक जागेतील कट्टयावरील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बुध्दाच्या मुर्तीच्या डाव्या हाताला लागला. दगड लागून मुर्तीच्या डाव्या हाताचा अंगठा व त्याच्या शेजारील एक बोट तुटलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त लावलेले डिजीटल बॅनल खालील बाजूस दगड लागून फाटलेले आहे. म्हणून फिर्यादी यांचे वरील आरोपी विरुध्द तक्रार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे या करत आहेत.

Post a Comment

0 Comments