google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढ्यात शेतातून गुप्त धन काढून देण्याच्या बहाण्याने घातला 61 लाखाला गंडा; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking News

मंगळवेढ्यात शेतातून गुप्त धन काढून देण्याच्या बहाण्याने घातला 61 लाखाला गंडा; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

 मंगळवेढ्यात शेतातून गुप्त धन काढून देण्याच्या बहाण्याने घातला 61 लाखाला गंडा; चौघांविरूध्द गुन्हा दाखल


मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु.) येथे शेतातून गुप्त धन काढून देण्याचा बहाणा करीत 61 लाख 70 हजार रुपये घेवून त्याच्या बदल्यात सोन्याच्या रंगाचे नकली व पितळी व इतर धातूचे नाणी, दागिने देवून फसवणूक केल्याप्रकरणी महंमद खादरसाहब शेख, रेवाप्पा विठोबा येड्डे, सन्नाप्पा विठोबा येड्डे, विठ्ठल रेवाप्पा रेड्डे (सर्व रा.हूलजंती) या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी लक्ष्मण रामचंद्र माने (वय 34 रा.सलगर खु.) यांचे सलगर बु. शेतात फिर्यादी यांचे वडीलांचे मेव्हणे सोपान तुकाराम पुजारी,नवनाथ तानाजी मेटकरी यांना शेतातून गुप्त धन काढून देण्याचे अमिष दाखवून सदर ठिकाणी पूजा, अंगारे, धूप जाळून राख उधळून वेळोवेळी रकमा घेवून कुटुंबातील सदस्यांच्या जीवीतास धोका होईल याची भिती घालून


61 लाख 70 हजार रुपये घेवून त्याच्या बदल्यात सोन्याच्या रंगाचे नकली, पितळी व इतर धातूचे दागिने देवून वरील आरोपींनी फसवणू केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना दि.13 जुलै 2021 रोजी सायंकाळी 6.00 वाजलेपासून ते दि.14 जानेवारी 2022 च्या रात्री 8.00 वाजण्याच्या कालाधीत घडली आहे.याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments