10 आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलणार..?
मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत केल्या आहेत. मार्च महिन्यात होणाऱ्या 10 आणि 12 वी च्या परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली.
तसेच वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं, यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बच्चू कडू म्हणाले की,‘कुणावरच विश्वास राहिलेला नाही, इतकी वाईट अवस्था आहे. वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं. तसेच या घोटाळ्याला पूर्णपणे व्यवस्था जबाबदार आहे.
त्यामुळे मिलिट्री आणल्यानंतरच सगळे व्यवस्थित होईल,’ असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.पुढे ते म्हणाले की,‘परीक्षांमधील हा घोळ हे व्यवस्थेचे मोठे अपयश असून हे मोठे रॅकेट मोडून काढण्यासाठी या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी जनआंदोलन करण्याची गरज आहे’, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत.
दरम्याण मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत केल्या. या ऑनलाईन बैठकीला शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0 Comments