google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! सोलापुरात पंतप्रधान माेदींचा कार्यक्रम Live दाखविला; ३९ जणांवर गुन्हा दाखल

Breaking News

धक्कादायक! सोलापुरात पंतप्रधान माेदींचा कार्यक्रम Live दाखविला; ३९ जणांवर गुन्हा दाखल

 धक्कादायक! सोलापुरात पंतप्रधान माेदींचा कार्यक्रम Live दाखविला; ३९ जणांवर गुन्हा दाखल 



पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काशी येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवून नागरिकांना आकर्षित करुन प्रक्षेपण स्थळी गर्दी जमवल्याने साेलापूरात एकूण ३९ जणांवर गुन्हा नाेंद झाला आहे



साेलापूरात २९ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू आहे. त्याचा भंग आयाेजकांनी केल्याने गुन्हा दाखल झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. जिल्ह्यात काेविड १९ चा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता नागरिकांसह विविध संस्था, संघटना यांनी घ्यावी असे आवाहन साेलापूर जिल्हाधिकारी आणि पाेलिस यंत्रणा सातत्याने करीत आहेत.गर्दीचे कार्यक्रम टाळण्यासाठी पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्रितपणे फिरण्यावर सोलापुरात निर्बंध लावण्यात आले आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काशी येथे नुकताच झालेल्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपण शहरातील ठिक ठिकाणी करण्यात आले. पंतप्रधान माेदी यांचा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्याने सोलापूर शहरात २९ डिसेंबर पर्यंत लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशा भंग झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.



सोलापूर शहरातील सदरबझार पोलिस ठाणे , एमआयडीसी पोलिस ठाणे ,जोडभावी पेठ पाेलिस ठाणे आणि जेलरोड पोलिस ठाण्यात आयाेजकांवर कारवाई करण्यात आली आहे एकूण ३९ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ओमिक्रॉनच्या अनुषंगाने शेजारच्या लातूर जिल्ह्यात गांभीर्य वाढले आहे. त्याची देखील दाखल प्रशासनाने घेत सर्वत्र नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची तपासणी करीत आहे.

Post a Comment

0 Comments