सोलापूर | पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांचा इशारा | बेकायदेशीर कराल तर......
सोलापूर : शहरात जनावरांची बेकायदेशीर कत्तल मोठ्या प्रमाणावर होते, जनावरांच्या कत्तलीबाबत आता पोलीस प्रशासनाने कडक अशी पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत जेलरोड पोलीस ठाणे आणि सदर बझार पोलीस ठाणे हददीत पोलीस ठाणेचे अधिकारी, अंमलदार, गुन्हेशाखा व आरसीपी पथक यांच्या संयुक्त कोम्बींग ऑपरेशन मध्ये एकूण १३ इसमा विरुध्द भारतीय हत्यार अधिनियम चे कलम ४/२५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम १३५, ३७ (१) प्रमाणे १३ गुन्हे दाखल करण्यात आले.
तसेच बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या एकूण ३ इसमा विरुध्द स्लॅटर हाऊस अधिनियम २००९ चे कलम ३, ८, सह भादवि कलम १८८, ४२९, ३४ प्रमाणे ३ गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
0 Comments