google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हा परिषद शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षकी पेशाला फासला काळीमा…

Breaking News

जिल्हा परिषद शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षकी पेशाला फासला काळीमा…

 जिल्हा परिषद शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षकी पेशाला फासला काळीमा… 


जिल्हा परिषद शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार;


शिक्षकास अटक शिक्षकी पेशाला फासला काळीमा…



वर्धा दि.२२ डिसेंबर -: वर्धा जिल्हा परिषद शाळेच्या एका नराधम शिक्षकाने वर्गातच आपल्या विद्यार्थिनीला गणित सोडवायला सांगून तिच्यासोबत संतापजनक लैंगिक अत्याचार करण्याचे कृत्य केल्याने त्या नराधम शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे.



मागील काही महिन्या पासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात मोठी प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील प्रत्येक विभागातून दररोज अत्याचाऱ्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना वर्धा मध्ये घडली आहे. येथील एका नराधमाने शिक्षिकी पेशाला काळिमा फासली आहे. नराधम शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देत पीडित मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे.



आरोपीनं पीडित मुलीला गणित सोडवायला सांगून तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. दीपक मंडलिक असं अटक झालेल्या आरोपी शिक्षकाचं आहे. आरोपी दीपक हा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील धुमनखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला आहे. घटनेच्या दिवशी २ डिसेंबर रोजी आरोपी दीपक याने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी दिली होती.




तर पीडित मुलीला एकटीला वर्गात बसायला सांगून गणित सोडवायला सांगितले होते. गणित सोडवत असताना आरोपी शिक्षकाने पीडितेजवळ जावून तिला दोन हजार रुपये दिले आणि तिच्याशी लैंगिक चाळे सुरु केले. घाबरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने काही वेळ आरोपीचा त्रास सहन केल्यानंतर, हातातील सर्व पैसे आरोपीच्या तोंडावर फेकून वर्गातून पळ काढला. नराधम शिक्षकाच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित मुलीने घरी जाऊन सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आहे.



या धक्कादायक प्रकार उघडकीस येताच, कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील चौकशी तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments