सावधान … वडापाव, पोहे इतर खाद्यपदार्थ पेपरमध्ये घेऊ नका अन्यथा…
पुणे : अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ५ ऑगस्ट २०११ पासून लागू करण्यात आला आहे. सदर कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करून देणे हा आहे.
शाईमध्ये आरोग्यासाठी घातक असे केमिकल
या अंतर्गत खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या दृष्टीने पुण्यामधील एक महत्वपूर्ण बातमी आहे. सर्वसामान्यांची भूक भागवणारा तसेच सर्वांच्या जीभेचे चोचले पुरवाणारा गरमा गरम वडापाव अथवा अन्य तळलेली खाद्यपदार्थ आता या पुढे वर्तमानपत्राच्या कागदामध्ये गुंडाळून देता येणार नाही. कारण, वर्तमानपत्र छपाई करताना वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये आरोग्यासाठी घातक असे केमिकल असते व ते जर खाद्यपदार्थांमध्ये मिसळले, तर यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. गरम खाद्यपदार्थ पेपेरमध्ये गुंडाळल्यास त्या पेपरची शाई विरघळते व ती खाद्यपदार्थाला लागून पोटात जाते, असे अन्न आणि औषध प्रशासनाचे म्हणणे आहे.
वृत्तपत्रामध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकींग करणे धोकादायक
भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण भारत सरकार यांनी ६ डिसेंबर २०१६ रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. वृत्तपत्रामध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. तरी सर्व अन्न व्यावसायिक छोटे-मोठे हॉटेल्स, बेकरी व्यावसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांना सुचित करण्यात येते की, वृत्तपत्रामध्ये अन्न पदार्थ पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा आपणाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल.
खूप वेळा बाहेरून नाष्टा मागिवला जातो. त्यावेळी अन्न व्यावसायिक हे वडापाव, पोहे या सारखे अन्न पदार्थ वर्तमानपत्रामध्ये बांधून देतात. त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच, वृत्तपत्राची शाई ही केमिकलपासून बनवलेली असते. या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी करतात.

0 Comments