मंत्रिपदाच्या शर्यतीतून आ . प्रणिती शिंदे बाहेर ?
सोलापूर , प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या असतानाही आ . प्रणिती शिंदे यांनी स्वत : ची वेगळी ओळख निर्माण केली . मोदी लाटेतही त्यांनी विरोधकांना पराभवाची चव चाखायला लावली . सलग तीनवेळा आमदार झाल्यानंतर पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पक्षाकडून मंत्रिपद मिळेल , असा विश्वास कार्यकर्त्यांना होता .
मात्र , सुरुवातीला कार्याध्यक्षा आणि आता प्रदेश प्रवक्तेपद दिल्याने त्यांची मंत्रिपदाची आशा मावळल्याची चर्चा आहे . आ . प्रणिती शिंदे यांनी जाई - जुई विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली . सर्वसामान्य कुटुंबातील महिला , महाविद्यालयीन तरुणतरुणींमध्ये त्यांची क्रेझ होती . ' सर्वसामान्यांचा आवाज ' म्हणून त्यांची ओळख झाली .
२०० ९ च्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी थेट मुंबईचे विधानभवन गाठले . माकपचे माजी आ . नरसय्या आडम , शिवसेनेच्या उमेदवारासह ११ जणांना टक्कर दिली . त्याचवेळी त्यांनी महापालिकेवरील सत्ताही टिकवून ठेवली . २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेक मातब्बरांना घरी बसावे लागले .

0 Comments