सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पेट्रोल पंप धारकांसाठी घेतला हा महत्त्वाचा निर्णय
ब्रेकिंग.. सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पेट्रोल पंप धारकांसाठी घेतला हा महत्त्वाचा निर्णय
सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही निर्बंध कडक केले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर दोन लस घेतलेल्यानाच पेट्रोल देण्याची सक्ती प्रशासनाने केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला मात्र अनेक पंपांवर ग्राहक पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून अंगावर जात असल्याचे चित्र समोर आले.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील पेट्रोल पंप चालकांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची कार्यालयात भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, सोलापूर शहर पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धेश्वर वाले, उपाध्यक्ष प्रकाश हत्ती, योगेश चडचणकर, नंदूशेठ बलदवा, जगदीश पाटील, मल्लिनाथ पाटील यांच्यासह शहरातील पेट्रोल पंप धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी लांडगे यांनी माहिती दिली, सोलापूर शहर व जिल्ह्यात 18 ते 45 या वयोगटातील लसीकरण न झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्या वयोगटातील लसीकरण अत्यंत गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे दोन कोरोना लस घेतलेल्यानाच पेट्रोल देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले पेट्रोल पंप धारकांनी याप्रकरणी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याशी चर्चा करून पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय झाला. प्रत्येक पेट्रोल पंपावर दोन पोलिस बंदोबस्त राहणार आहे तसेच शहरातील नवल, सुपर, कारीगर अशा प्रमुख पेट्रोल पंपांवर लसीकरणाची सोय करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

0 Comments