google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पश्‍चिम महाराष्ट्रात जनावरांचा सर्वाधिक मोठा आठवडी बाजार सांगोल्यात भरला जातो. सांगोला : राज्यात बंदी घालण्यात आलेला बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ही बंदी उठविल्याने आठवडा बाजारामध्ये पुन्हा खिलार बैलांचे व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू होणार असल्याने आठवडा बाजाराच्या आर्थिक उलाढालीवरही याचा परिणाम दिसून येणार आहे. शर्यतीसाठी हौसेने बैल संभाळणाऱ्या शेतकऱ्यांनी तर पेढे वाटून आनंद साजरा केला. सांगोला हे जसे डाळिंबीसाठी अग्रेसर आहे, त्याचप्रमाणे सांगोल्याचा आठवडी बाजार हा खिल्लार गायी-बैलांसाठी प्रसिद्ध आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात जनावरांचा सर्वाधिक मोठा आठवडी बाजार सांगोल्यात भरला जातो. यामध्ये इतर बाजाराच्या तुलनेत खिलार गायी, बैलांची उलाढालही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बैलगाडा शर्यतीसाठी लागणारी खोंडे खरेदीसाठी महाराष्ट्रासह इतर शेजारील कर्नाटकातून शेतकरी व व्यापारी सांगल्याच्या आठवडे बाजारात येत असतात. परंतु, न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणल्याने खिलार गाई-बैलांच्या खरेदी विक्रीवर फार मोठा परिणाम झाला होता. खिलार जनावरांमध्ये बैलांसाठी मोठी मागणी असते. बंदीच्या काळात लाखो रुपयांना विकणारी खिलार खोंडे नाममात्र किंमतीने किंवा कत्तलखान्याकडेही काही वेळेस जातानाचे चित्र दिसून येत होते. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती काही अटीवर सुरू करण्यास परवानगी दिल्याने याचा परिणाम खिलार बैलांच्या खरेदी विक्रीवर मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. कत्तलखान्याकडे जाणारे जनावरांनाही आत्ता मागणी आपोआपच वाढणार आहे. गाई-बैलांची मागणी वाढल्याने याचा व्यापाऱ्यांच्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम दिसणार आहे. जातीवंत खोंडाची वाढणार मागणी खिलार बैलांचा वापर शेतीसह शर्यतीसाठी मोठा वापर होता. चपळ, दणकट तसेच वेगाने धावणारी जात म्हणूनच खिलार बैलांचा वापर शर्यतीसाठी करतात. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यामुळे अशा जातिवंत खोंडाना मागणी कमी झाली होती. त्यामुळे संभाळून खोंडे विकणारे शेतकरीही अडचणीत सापडला होता. परंतु, आता बंदी उठवल्याने या खोडांना मोठी मागणी वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी उठविल्याने खिलार खोडांना मोठी मागणी वाढणार आहे. त्यामुळे आपोआपच शेतकऱ्यांनाही चांगली किंमत मिळणार असून आम्हा व्यापाऱ्यांच्याही खरेदी-विक्रीत वाढ होणार आहे. याचा आठवडे बाजाराच्या एकूण उलाढालीवर परिणाम दिसणार आहे. - जयवंत जगताप, खिलार बैल व्यापारी, मांजरी, (ता. सांगोला)माझ्याकडे पाच लाख रुपये किंमतीचे दोन शर्यतीसाठीचे बैल आहेत. परंतु बंदी असल्याने त्यांना सांभाळ करणेही मुश्‍कील झाले होते. आत्ता बंदी उठल्याने मोठा आनंद झाला असून कधी एकदा बैलांना हुर्रर्र.. करतोय असं झालयं. - मल्हारी हाके, रा. सोनके, (ता. पंढरपूर)

Breaking News

पश्‍चिम महाराष्ट्रात जनावरांचा सर्वाधिक मोठा आठवडी बाजार सांगोल्यात भरला जातो. सांगोला : राज्यात बंदी घालण्यात आलेला बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ही बंदी उठविल्याने आठवडा बाजारामध्ये पुन्हा खिलार बैलांचे व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू होणार असल्याने आठवडा बाजाराच्या आर्थिक उलाढालीवरही याचा परिणाम दिसून येणार आहे. शर्यतीसाठी हौसेने बैल संभाळणाऱ्या शेतकऱ्यांनी तर पेढे वाटून आनंद साजरा केला. सांगोला हे जसे डाळिंबीसाठी अग्रेसर आहे, त्याचप्रमाणे सांगोल्याचा आठवडी बाजार हा खिल्लार गायी-बैलांसाठी प्रसिद्ध आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात जनावरांचा सर्वाधिक मोठा आठवडी बाजार सांगोल्यात भरला जातो. यामध्ये इतर बाजाराच्या तुलनेत खिलार गायी, बैलांची उलाढालही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बैलगाडा शर्यतीसाठी लागणारी खोंडे खरेदीसाठी महाराष्ट्रासह इतर शेजारील कर्नाटकातून शेतकरी व व्यापारी सांगल्याच्या आठवडे बाजारात येत असतात. परंतु, न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणल्याने खिलार गाई-बैलांच्या खरेदी विक्रीवर फार मोठा परिणाम झाला होता. खिलार जनावरांमध्ये बैलांसाठी मोठी मागणी असते. बंदीच्या काळात लाखो रुपयांना विकणारी खिलार खोंडे नाममात्र किंमतीने किंवा कत्तलखान्याकडेही काही वेळेस जातानाचे चित्र दिसून येत होते. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती काही अटीवर सुरू करण्यास परवानगी दिल्याने याचा परिणाम खिलार बैलांच्या खरेदी विक्रीवर मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. कत्तलखान्याकडे जाणारे जनावरांनाही आत्ता मागणी आपोआपच वाढणार आहे. गाई-बैलांची मागणी वाढल्याने याचा व्यापाऱ्यांच्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम दिसणार आहे. जातीवंत खोंडाची वाढणार मागणी खिलार बैलांचा वापर शेतीसह शर्यतीसाठी मोठा वापर होता. चपळ, दणकट तसेच वेगाने धावणारी जात म्हणूनच खिलार बैलांचा वापर शर्यतीसाठी करतात. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यामुळे अशा जातिवंत खोंडाना मागणी कमी झाली होती. त्यामुळे संभाळून खोंडे विकणारे शेतकरीही अडचणीत सापडला होता. परंतु, आता बंदी उठवल्याने या खोडांना मोठी मागणी वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी उठविल्याने खिलार खोडांना मोठी मागणी वाढणार आहे. त्यामुळे आपोआपच शेतकऱ्यांनाही चांगली किंमत मिळणार असून आम्हा व्यापाऱ्यांच्याही खरेदी-विक्रीत वाढ होणार आहे. याचा आठवडे बाजाराच्या एकूण उलाढालीवर परिणाम दिसणार आहे. - जयवंत जगताप, खिलार बैल व्यापारी, मांजरी, (ता. सांगोला)माझ्याकडे पाच लाख रुपये किंमतीचे दोन शर्यतीसाठीचे बैल आहेत. परंतु बंदी असल्याने त्यांना सांभाळ करणेही मुश्‍कील झाले होते. आत्ता बंदी उठल्याने मोठा आनंद झाला असून कधी एकदा बैलांना हुर्रर्र.. करतोय असं झालयं. - मल्हारी हाके, रा. सोनके, (ता. पंढरपूर)

 पश्‍चिम महाराष्ट्रात जनावरांचा सर्वाधिक मोठा आठवडी बाजार सांगोल्यात भरला जातो.



सांगोला  : राज्यात बंदी घालण्यात आलेला बैलगाडा शर्यतींना  सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ही बंदी उठविल्याने आठवडा बाजारामध्ये पुन्हा खिलार बैलांचे व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू होणार असल्याने आठवडा बाजाराच्या आर्थिक उलाढालीवरही याचा परिणाम दिसून येणार आहे. शर्यतीसाठी हौसेने बैल संभाळणाऱ्या शेतकऱ्यांनी तर पेढे वाटून आनंद साजरा केला.




सांगोला हे जसे डाळिंबीसाठी  अग्रेसर आहे, त्याचप्रमाणे सांगोल्याचा आठवडी बाजार हा खिल्लार गायी-बैलांसाठी प्रसिद्ध आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात जनावरांचा सर्वाधिक मोठा आठवडी बाजार सांगोल्यात भरला जातो. यामध्ये इतर बाजाराच्या तुलनेत खिलार गायी, बैलांची उलाढालही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बैलगाडा शर्यतीसाठी लागणारी खोंडे खरेदीसाठी महाराष्ट्रासह इतर शेजारील कर्नाटकातून शेतकरी व व्यापारी सांगल्याच्या आठवडे बाजारात येत असतात.



 परंतु, न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणल्याने खिलार गाई-बैलांच्या खरेदी विक्रीवर फार मोठा परिणाम झाला होता. खिलार जनावरांमध्ये बैलांसाठी मोठी मागणी असते. बंदीच्या काळात लाखो रुपयांना विकणारी खिलार खोंडे नाममात्र किंमतीने किंवा कत्तलखान्याकडेही काही वेळेस जातानाचे चित्र दिसून येत होते. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती काही अटीवर सुरू करण्यास परवानगी दिल्याने याचा परिणाम खिलार बैलांच्या खरेदी विक्रीवर मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. कत्तलखान्याकडे जाणारे जनावरांनाही आत्ता मागणी आपोआपच वाढणार आहे. गाई-बैलांची मागणी वाढल्याने याचा व्यापाऱ्यांच्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम दिसणार आहे.




जातीवंत खोंडाची वाढणार मागणी खिलार बैलांचा वापर शेतीसह शर्यतीसाठी मोठा वापर होता. चपळ, दणकट तसेच वेगाने धावणारी जात म्हणूनच खिलार बैलांचा वापर शर्यतीसाठी करतात. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यामुळे अशा जातिवंत खोंडाना मागणी कमी झाली होती. त्यामुळे संभाळून खोंडे विकणारे शेतकरीही अडचणीत सापडला होता. परंतु, आता बंदी उठवल्याने या खोडांना मोठी मागणी वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी उठविल्याने खिलार खोडांना मोठी मागणी वाढणार आहे.



 त्यामुळे आपोआपच शेतकऱ्यांनाही चांगली किंमत मिळणार असून आम्हा व्यापाऱ्यांच्याही खरेदी-विक्रीत वाढ होणार आहे. याचा आठवडे बाजाराच्या एकूण उलाढालीवर परिणाम दिसणार आहे. - जयवंत जगताप, खिलार बैल व्यापारी, मांजरी, (ता. सांगोला)माझ्याकडे पाच लाख रुपये किंमतीचे दोन शर्यतीसाठीचे बैल आहेत. परंतु बंदी असल्याने त्यांना सांभाळ करणेही मुश्‍कील झाले होते. आत्ता बंदी उठल्याने मोठा आनंद झाला असून कधी एकदा बैलांना हुर्रर्र.. करतोय असं झालयं. - मल्हारी हाके, रा. सोनके, (ता. पंढरपूर)

Post a Comment

0 Comments