5 की 6 वर्षे.. पहिलीत प्रवेशासाठी किती वय हवं…? शिक्षण संचालनालयाने सोडविला तिढा..!
राज्य शिक्षण मंडळाव्यतिरिक्त महाराष्ट्रात सीबीएसई, आयसीएई, आयबी अशा विविध बोर्डाच्या शाळा कार्यरत आहेत. या बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीला प्रवेश देताना, विद्यार्थ्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या तारखा ग्राह्य धरल्या जात होत्या. पूर्व प्राथमिकमध्येही प्रवेशासाठी वयाची निश्चित अशी अट नव्हती.
प्ले ग्रुप, नर्सरी व पहिलीला प्रवेश देताना, विद्यार्थ्याचं नेमकं वय किती असावं, याबाबत मागील वर्षी शासनाने आदेश दिला होता. त्यानुसार, ३१ डिसेंबर ही तारीख ग्राह्य धरण्यात आली होती.. तोपर्यंत वयाची 6 वर्षे पूर्ण झाल्यास, पहिलीत प्रवेश मिळू शकेल, असे स्पष्ट केले होते.
शिक्षण संचलनालयाने त्यावेळी ३० सप्टेंबर ऐवजी ३१ डिसेंबर अशी शिथिलता आणली. मात्र, त्यानंतरही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमधील जन्मलेल्या मुलांच्या पहिलीतील प्रवेशाबाबत अडचणी येऊ लागल्या…
विद्यार्थ्यांच्या वयाबाबत स्पष्टीकरण
सगळ्या बाेर्डामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी अखेर प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने पहिलीसाठी प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या वयाबाबत स्पष्टीकरण दिलेय.. शिक्षण संचलनालयाने पुन्हा एकदा परिपत्रक काढले आहे..
त्यानुसार, आता १ ऑक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान जन्मलेल्या आणि वयाची ६ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश घेता येणार आहे.. राज्यातील सर्व मंडळाच्या शाळांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात नर्सरी, पहिली प्रवेशांसाठी हा नियम लागू राहणार आहे.

0 Comments