एन . डी . एम . जे . च्या राज्य अधिवेशनास सोलापूर जिल्ह्यातुन हजारो कार्यकर्ते घेऊन जाणार - जिल्हाध्यक्ष पंकजकुमार काटे
७ जानेवारी २०२२ रोजी नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन मौजे नातेपुते ता . माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी पार पडणार आहे . या अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार नितीन राऊत साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत .
या अधिवेशनात राज्यातील अनुसूचित जातीजामातीच्या आर्थिक सामाजिक राजकीय उन्नतीच्या २२ मागण्या मंत्री महोदयाच्या · माध्यमातून राज्य सरकार कडे करण्यात येणार आहेत या २२ मागण्या वेतिरिक्त अन्य जाती धर्मातील जनकल्याणाच्या ही मागण्या केल्या जाणार आहेत यामध्ये उदा .
कोतवाल पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा वर्कर ऊसतोड कामगार बांधकाम कामगार सफाई कामगार यांच्याही प्रश्नाचा समावेश असणार आहे अधिवेशनाची अतिशय जोरदार तयारी संबंध राज्यात संघटनेचे महासचिव डॉ . केवलजी उके साहेब व या राज्याचे लोकप्रिय आंबेडकरी चळवळीचे युवा नेते मा . वैभवजी गिते साहेबांच्या मार्गदर्शना खाली चालू आहे
या अधिवेशनास सोलापूर जिल्ह्यातुन सांगोला पंढरपूर मंगळवेढा मोहोळ बार्शी या माळशिरस या तालुक्यातुन १००० आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते घेऊन जाणार असल्याचे या संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मा . पंकजकुमार काटे यांनी सांगितले या साठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गावभेट दौरा चालू आहे या अधिवेशनास जिल्ह्यातील अनेक मातब्बर राजकीय नेते मंडळी विविध क्षेत्रातील नामवंत वेक्ती प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत . विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या नामवंताना
संघटनेच्या वतीने संघटनेचा राजस्तरीय पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौर करण्यात येणार आहे या अधिवेशनास सामाजिक जाण भान असणाऱ्या विविध प्रश्नावर्ती लोक कल्याणासाठी कामकारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकजकुमार काटे यांनी केले .
0 Comments