google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संकेत काळे यांनी पटकाविला "आंतरमहाविद्यालयीन श्री" किताब

Breaking News

संकेत काळे यांनी पटकाविला "आंतरमहाविद्यालयीन श्री" किताब

 संकेत काळे यांनी पटकाविला "आंतरमहाविद्यालयीन श्री" किताब



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  आयोजित आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत सांगोला येथील बॉडीबिल्डर संकेत संजय काळे यांनी घवघवीत यश संपादन केले. 


 विठ्ठलराव बुट्टेपाटील सभागृह, राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर येथे 16 डिसेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत संकेत काळे यांनी "आंतरमहाविद्यालयीन श्री" हा मानाचा किताब आपल्या नावावर करीत यशाची परंपरा कायम राखली.


अतिशय कमी वयात संकेत यांनी अनेक स्पर्धेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. यापूर्वी त्यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवित सांगोल्याच्या नावलौकिकात  भर पाडली आहे.


या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments