सांगोले तालुक्यात पुंन्हा शेकापक्षाचा बोलबाला
सांगोले तालुक्यातील 7 जागेच्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर झालेल्या होत्या त्या पैकी खवासपुर ,मेडशिंगी,सोनंद या तीन जागेचे मतदान मंगळवार दि 21/12/2021 रोजी पार पडले व त्या तींन्हीही जागेचे निकाल बुधवार दि 22/12/2021 रोजी जाहीर करण्यात आले त्यामध्ये खवासपुरच्या सौ सविता संभाजी भोसले ,सोनंद रंजना केशव बाबर,मेडशिंगी सुशिला मनोहर सोनलकर हे शेतकरी कामगार पक्षाचे ऊमेदवार प्रचंड मताने विजयी झाले.
तसेच लक्ष्मीनगरचे लक्ष्मण नरळे ,कटफळच्या सौ अश्विनी प्रशांत कारंडे हे शेकापक्षाचे ऊमेदवार बिनवीरोध निवडुन आलेले आहेत चिकमहुद व धायटी या ठिकाणी शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या आघाडीला दोनच जागी यश संपादन झाले आहे.
आशा प्रकारे स्व आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतरची पहिलीच निवडणुक आहे त्याही निवडणुकीत शेकपक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे.
पुरोगामी युवकसंघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ भाई बाबासाहेब देशमुख व युवा नेते डाँ भाई अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेषता तरुणांनी ह्या निवडणुका ताब्यात घेतल्या होत्या.
भाई चंद्रकांतदादा देशमु ,चिटणिस दादाशेठ बाबर,भाई बाबासो,करांडे सभापती,उपसभापती जिल्हापरीषद सदस्य व पंचायत समीती सदस्य यांनी केलेली कामे यांच्या जोरावरती व गावोगावच्या कार्यकरत्यांच्या मेहनतीवर हा विजय संपादन करण्यात आला आहे.....
विशेषता खवासपुर येथील निवडणुकीमध्ये विद्ययमाना आमदार,विद्यमान जिल्हापरिषद सदस्य ,विद्यमान पंचायत समीती सदस्य यांनी आपली प्रतीष्ठा पणालालावलेली होती तरीही सुज्ञ मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाजुने मतदान करुन एक इतिहास निर्माण केला.
येणार्या जिल्हापरिषद पंचायत समीतीच्या निवडणुकमध्ये ह्या निकालाचा निश्चीत परीणाम होईल ह्या निकालामुळे शेकापक्षामध्ये आक्षरशा नवचैतन्य निर्माण झाले आहे व सांगोले तालुक्यात स्व आबासाहेबांच्या विचारांचा पुंन्हा एकदा बोलबाला आसलेचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगीतले.

0 Comments