google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढा-सोलापूर हायवे बनला मृत्यूचा सापळा, कार व टेम्पोचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Breaking News

मंगळवेढा-सोलापूर हायवे बनला मृत्यूचा सापळा, कार व टेम्पोचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

 मंगळवेढा-सोलापूर हायवे बनला मृत्यूचा सापळा, कार व टेम्पोचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू


मंगळवेढा सोलापूर रोडजवळ समोरासमोर दोन वाहनांची जोराची धडक होऊन दोघे जण जागीच ठार झाले.तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.२५) पहाटे साडेपाच वाजता मंगळवेढाकडून पंढरपूर बायपास संत दामाजी कारखाना परिसरात हा अपघात झाला.



सोलापूरहुन येणाऱ्या इर्टिगा (MH.10.DQ.4760) आणि सोलापूरकडे जाणाऱ्या टेम्पोची (MH.09.EM.4660) समोरासमोर जोराची धडक होऊन हा अपघात झाला.दरम्यान, सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील उमदी येथील दोघांचा मृत्यू झाला तर उर्वरीत चौघे जखमी आहेत. सर्वजण औरंगाबाद येथे इज्तिमासाठी मागच्या तीन दिवसांपासून गेले होते.



हा कार्यक्रम संपवून रात्री परतत असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये जैनुद्दिन काशीम यादगीरे (वय ४०) मौलाना साजिद खान (वय ४५) हे दोघे जागेवरच ठार झाले हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला. असू यामध्ये इर्टिगाचा चक्काचूर झाला आहे. चारही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments