सांगोला तालुक्यात 8 जी प गट तर 16 पंचायत समिती गण होणार.
सांगोला-तालुक्याच्या वाढत्या लोकसंख्येनुसार व सध्याच्या सात जिल्हा परिषद गटातील ४० ते ४१ जास्तीतील मतदार संख्या कमी होऊन वाढीव मतदार संख्येतून तालुक्यात नवीन जिल्हा परिषद गट अस्तित्वात येणार आहे त्यानुसार संभाव्य वाढेगाव जिल्हा परिषद गट निर्मिती होऊन वाढेगाव सह शिरभावी धायटी व हलदहिवडी यापैकी एक पंचायत समिती गणाची निर्मितीचे संकेत मिळत आहेत तसे झाल्यास सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ८ तर सांगोला पंचायत समिती सदस्यांचे संख्याबळ १६ होणार आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार सांगोला तालुक्याची लोकसंख्या २ लाख ८८ हजार ५२४ इतकी आहे. त्यावेळी ४० ते ४१ हजार मतदानाचे जिल्हा परिषद गट निर्मिती झाली होती परंतु सतत वाढणाऱ्या लोकसंख्या च्या आधारे जिल्हा परिषद गट नव्याने अस्तित्वात येत आहे.
शासन परिपत्रक ४ ऑक्टोंबर २०११ नुसार तालुक्याची भौगोलिक रचना ,लोकसंख्या व आरक्षणाचा विचार करता गट निर्मिती बरोबर इतर अनुशासिक बाबीचा विचार होऊन २,८८,५२४ मतदानाच्या आकडेवारी नुसार प्रत्येकी ३६ हजार ३६५ मतदार संख्येचा एक गट याप्रमाणे पुर्वीचे ७ व नवीन अस्तित्वात येणारा १ असे एकूण ८ जिल्हा परिषद गट तयार होवू शकतात तसेच झाल्यास संभाव्य वाढेगाव गटाची नव्याने निर्मिती होऊ शकते
तर वाढेगाव पंचायत समिती गण व धायटी, शिरभावी व हलदहिवडी या तीन गावांपैकी एक पंचायत समिती गण अस्तित्वात येणार आहे. दरम्यान उत्तरेकडून:( महूद )चढत्या क्रमाने मतदार संख्येनुसार जिल्हा गटाची आखणी होणार आहे सध्या ७ जिल्हा परिषद गटातील प्रत्येकी चार ते पाच गावे कमी होऊन ती पुढील प्रत्येक गटास जोडली जाणार आहेत त्यामधून वाढणारी गावे व मतदानानुसार नवीन गटांची निर्मितीचे संकेत मिळत आहेत. दरम्यान नवीन जिल्हा परिषद गट निर्मिती झाल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे दावे हरकतीवर विभागीय आयुक्त समोर सुनावणी होऊन गट निर्मितीस अंतिम स्वरूप येऊन त्यानंतरच गट निर्मितीची अंतिम घोषणा होणार आहे.
नवीन जिल्हा परिषद गट निर्मितीच्या अनुषंगाने सद्याच्या जिल्हा परिषद गटातील एकुण मतदान, जास्तीतील मतदानाची गावे या संदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सर्व बाबीची प्रक्रिया पूर्ण करून नवीन गट अस्तित्वात येणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपत आहे. त्या अनुषंगाने नवीन जिल्हा परिषद गटाची निर्मिती होणार असल्याने राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीसह पदाधिकारी कार्यकर्त्याचे डोळे जिल्हाधिकाऱ्यांच्या घोषणेकडे लागली आहेत.
सांगोला तालुक्यात सध्या घेरडी जवळा कोळे नाझरे एखतपुर महूद कडलास असे ७ जिल्हा परिषद गट आहेत शासन परिपत्रकानुसार सध्याच्या जिल्हा परिषद गटातील मतदान कमी होऊन वाढीव मतदानातून नवीन वाढेगाव जिल्हा परिषद गटाची निर्मिती होणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे ८ गट होणार आहेत तर पंचायत समिती एकूण १६ सदस्यांची असणार आहे.

0 Comments