google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा लाभ मिळणार

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा लाभ मिळणार

 सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा लाभ मिळणार


सोलापूर / प्रतिनिधी : प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान अधारि फळपिक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहार २०२१ मध्ये पुर्नरचित हवामान अधारित फळपिक विमा योजना सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या १६८६८ शेतकऱ्यांना मिळणार विमा रक्कम मिळणार आहे . त्याबाबत रिलायन्य जनरल इन्शुरन्स प्रा . लि . कंपनीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय सोलापूर यांना कळविलेले असुन त्यानुसार अंदाजीत शेतकरी संख्या १६८६८ व रक्कम रुपये १८ ९ ७.८६ लक्ष फळपिक विमा शेतकऱ्यांना मिळणार असलेबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , सोलापूर यांनी कळविले आहे . लवकरच खालील प्रमाणे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे . तालुका निहाय शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे रक्कम मिळणार आहे . अक्कलकोट तालुक्यातील १८ शेतकऱ्यांना प्रत्येकी २ लाख ६२ हजार रूपये , बार्शी तालुक्यातील १०७ शेतकऱ्यांना १५ लाख ०५ हजार रूपये , करमाळा तालुक्यातील ६५ शेतकऱ्यांना १० लाख ४ ९ हजार रूपये , माढा तालुक्यातील ७ ९ शेतकऱ्यांना १० लाख ४४ हजार रूपये , माळशिरस तालुक्यातील ६०४ शेतकऱ्यांना ७७ लाख ३८ हजार रूपये , मंगळवेढा तालुक्यातील ४३५० शेतकऱ्यांना ४६० लाख ७५ हजार रूपये , मोहोळ तालुक्यातील २ ९ शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार रूपये , पंढरपुर तालुक्यातील ६१० शेतकऱ्यांना ६१ लाख ०४ हजार रूपये , सांगोला तालुक्यातील १० ९ ८५ शेतकऱ्यांना १२५६ लाख ०६ हजार रूपये दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांना २ लाख ४३ हजार रूपये .

Post a Comment

0 Comments