संजय गांधी निराधार योजनेसह इतर पेन्शन योजनांची चौकशी करा, सामान्य नागरिकांना न्याय द्या रविंद्र कांबळे यांची मागणी
तहसील आवारा मधील बोगस एजंटचा बंदोबस्त करा .
सांगोला-( साप्ता.शब्दरेखा एक्सप्रेस न्युज) केंद्र सरकार सह महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक योजना सामान्य नागरिकासाठी उपलब्ध केलेल्या आहेत या योजनांचा लाभ घेऊन तालुक्यातील सामान्य नागरिकांना याचा फायदा व्हावा व त्यांचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत त्या योजना राबवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व त्यांची पूर्तता करण्यासाठी सामान्य नागरिकांना सांगोला तहसील आवारामध्ये असलेल्या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रे दिल्यानंतर संबंधित नागरिकास योजना मिळत असते
परंतु ही योजना झटपट व बेकायदेशीर मिळवून देण्यासाठी सांगोला तहसील आवारामध्ये अनेक एजंटाचा सुळसुळाट सुरू झालेला आहे त्यामुळे ज्या व्यक्तीकडे आर्थिक देवाण-घेवाण करण्याची परिस्थिती आहे अशा लोकांच्या शोधात हे हातामध्ये कसलीतरी पिशवी घेऊन एजंट फिरत असतात
एखाद्या प्रकरणासाठी कागदपत्रांची कमतरता असलेल्या सामान्य नागरिक यांची अडवणूक करून कागदपत्रे कमी असले तरी माझ्या वशिलेबाजी वर तुमचे बेकायदेशीर कामदेखील कायदेशीर करून देतो म्हणून संबंधित नागरिकास व्यक्तीस शालेय विद्यार्थी व महिला यांना फूस लावून लवकरात लवकर करून देतो अशा बहाण्याने त्यांची कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आर्थिक लूट करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहेत हे एजंट कार्यालयांमध्ये दिवसभर हातात कागदपत्रे घेऊन फिरत असतात तर याच आवारातील निराधार पेन्शन योजनेचे संबंधित शासकीय अधिकारी देखील त्यांना खुर्चीवर बसवून चर्चा करणे त्याचबरोबर बाहेर हॉटेलमध्ये नेऊन चहा पिणे चहा पिण्याच्या बहाण्याने काही कर्मचारी तासंतास हॉटेलमध्ये कोल्ड्रिंक्स मध्ये या एजंट बरोबर बसलेले दिसत आहेत
त्यामुळे ज्याची पात्रता नाही अशा अपात्र लोकांची संजय गांधी निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ पेन्शन योजना व पी एम किसान योजना यासह इतर योजनांची देखील प्रकरणे मंजूर होत आहेत कागदपत्रांमध्ये खाडाखोड करणे व त्या कागदपत्रांची झेरॉक्स काढणे बनावट कागदपत्रे तयार करणे प्रत्यक्ष व्यक्तीने सेतू कार्यालयामध्ये हजर राहून प्रतिज्ञापत्र करणे गरजेचे असताना काही सेतू कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे एजंट फोटो वरून फोटो काढून प्रतिज्ञापत्र तयार करत आहेत त्याच बरोबर या प्रकरणासाठी लागणारा मंडल अधिकारी (सरकल) अहवाल देखील बनावट व संबंधित मंडलाधिकारी जागे वरती जाऊन पाहणी न करता अहवाल देत आहेत पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा देखील लाभ मिळत आहे पात्र लाभार्थ्यांच्या नावावरती अनेक जमिनीचे भूखंड आहेत तरीसुद्धा ते पात्र झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गरजवंत व ज्यांना खरी गरज आहे असे खरे लाभार्थी अनेक लाभापासून वंचित आहेत त्यामुळे सर्व पेन्शन योजनांची व पी एम किसान योजनांची तपासणी करून पात्र अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम घेऊन तपासणी करावी या मागणीची तक्रार बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी तहसीलदार यांच्याकडे दिलेली आहे शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शन योजनेचे रक्कम वाढवून मिळावी याबाबत बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते त्या आंदोलनानंतर शासनाने पेन्शन योजनेची रक्कम वाढवलेली होती
त्यामुळे सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील यांनी त्वरित पथक नेमून दुसऱ्या ची कागदपत्रे हातामध्ये घेऊन तहसील आवारात व कार्यालयात फिरणाऱ्या एजंट वर व सर्व पेन्शन योजनांच्या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणा-या व्यक्ती वरती व अधिकाऱ्यावर ती कारवाई करण्याची व त्यांची बदली करण्याची मागणी तक्रारदार व नागरिकांतून केली जात आहे
या बनावट प्रकरणामुळे निराधार पेन्शन योजना सारख्या काही योजना एकाच गावांमध्ये अनेक लोकांना मिळत आहेत त्याच गावांमधील इतके लाभार्थी कसे ते एजंटच्या माध्यमातूनच मंजूर झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शासनाच्या अनेक योजना मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करून एजंट व कर्मचारी यावरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे तसेच जे अधिकारी अशा कर्मचार्यांना वारंवार कार्यालयात येऊ देतात व त्यांच्याशी चहापान करतात व त्यांना बेकायदेशीर मदत करतात त्यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे
0 Comments