google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वंदे मातरम चौक ते मिरज रोड रेल्वे गेट बायपास रस्त्याचे काँक्रिटीकरण कामासाठी ५ कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

वंदे मातरम चौक ते मिरज रोड रेल्वे गेट बायपास रस्त्याचे काँक्रिटीकरण कामासाठी ५ कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

वंदे मातरम चौक ते मिरज रोड रेल्वे गेट बायपास रस्त्याचे काँक्रिटीकरण कामासाठी ५ कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील 

 

सांगोला शहरासाठी अत्यंत महत्वाचा व वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय सोयीचा असणारा मिरज रोड रेल्वे गेट ते वंदे मातरम चौक महुद चौक या नगरपालिकेच्या बायपास रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे या रस्त्याचे दोन्ही बाजूंनी गटारीसह पूर्णपणे काँक्रिटीकरण करण्याचे काम मंजूर करण्याचा शब्द आमदार शहाजीबापू पाटील यांनी निवडणुकीच्या वेळी दिला होता. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आग्रही मागणीवरून महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याकडून सांगोला नगरपालिकेच्या या कामाला मान्यता देऊन पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती मुंबईतून दूरध्वनीवरून बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.


          मिरज रोड रेल्वे गेट ते वंदे मातरम चौक हा बायपास रस्ता शहरातील व आसपासच्या अनेक गावातील नागरिकांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय गरजेचा व सोयीचा आहे परंतु हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे व कितीही किरकोळ दुरुस्ती केली तरी हा रस्ता खचत आहे त्यामुळे कायमस्वरूपी रस्ता चांगला ठेवायचा असल्यास या रस्त्याचे साईड गटारीसह पूर्णपणे कॉंक्रिटीकरण करणे गरजेचे होते आणि यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणे गरजेचे होते यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आग्रही मागणी करून या रस्त्यासाठी भरीव निधीची मागणी केली होती यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला नगरपालिकेच्या या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयाचा भरीव निधी विशेष रस्ता अनुदानातून मंजूर केला आहे.


          हा बायपास रस्ता करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्या काळामध्ये प्राथमिक मंजुरी मिळवून रस्त्याचे काम तत्कालीन नगराध्यक्ष मारुती बनकर यांच्या काळामध्ये पूर्ण झाले होते. तालुका क्रीडा संकुल, ईदगाह मैदान, सांगोला न्यायालय या ठिकाणांसह भविष्यात होणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व आरटीओ कार्यालय यासाठी हा बायपास रस्ता अत्यंत गरजेचा आहे शिवाय या रस्त्याच्या बाजूने बरेच नवीन व्यवसाय सुरू होत असून हा रस्ता भविष्यात महत्वपूर्ण व्यापारी पेठ होऊ शकतो. त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला शहरासाठी स्वच्छ सांगोला, सुंदर सांगोला, समृद्ध सांगोला, श्रीमंत सांगोला हा संकल्प करून नियोजन केलेल्या कामांमधील हा बायपास रस्ता महत्त्वाचा टप्पा आहे.


           या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांच्यामार्फत केले जाणार असून सांगोला-पंढरपूर रस्त्याच्या धर्तीवर पूर्णपणे मजबूत काँक्रीटीकरणाचे अंदाजपत्रक तयार केले जाणार असून अत्यंत चांगल्या प्रतीचे काम केले जाणार आहे जेणेकरून पुढील अनेक दशके हा रस्ता खराब होणार नाही याची दक्षता घेऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घेणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments