जिल्हा परिषदेत नवा नियम, सीईओ दिलीप स्वामी यांनी केली स्वतः पासून सुरुवात
सोलापूर : जिल्हा परिषदेचा परिसर पाहिला तर सर्वत्र वाहनेच वाहने. चारचाकी दुचाकी कुठेही पार्किंग, त्यामुळे बेशिस्तीचे दर्शन होत असे. जिल्हा परिषदेच्या आवारात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर विभाग प्रमुख यांची वाहने लावण्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था असतानाही कोण कुठेही वाहने लावत होती.
जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये तर अधिकारी पदाधिकारी पेक्षा इतर पुढाऱ्यांची वाहन जास्त दिसत आहेत. काही ठराविक जिल्हा परिषद सदस्यांची वाहने लावण्यासाठी मुजोरी दिसून येते,स्वतःला पदाधिकारी समजून ते ठरलेल्या ठिकाणी वाहने उभी करतात, त्यांच्यामुळे प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांना वाहने लावता येत नाहीत असे चित्र मागील अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होते.
त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी एकूणच चित्र पाहिल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या पार्किंगला शिस्त लावण्याचे ठरवले एकही वाहन पोर्चमध्ये येणार नाही अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या त्याची अंमलबजावणी सोमवार 29 नोव्हेंबर पासून करण्याचे प्रशासनाने ठरवले त्या पद्धतीने सोमवारी तसे चित्र दिसून आले.
स्वतः दिलीप स्वामी हे आत आल्यानंतर त्यांनी संविधानाच्या शिल्पासमोरच आपले वाहन थांबून ते कार्यालयाकडे चालत गेले. त्यापूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील या सुद्धा तिथेच उतरून चालत गेल्या. आता मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी स्वतःपासून वाहन पार्किंग शिस्तीचे दर्शन घडल्याने आता पदाधिकारी आणि इतर झेडपी सदस्य ते कितपत स्वीकारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0 Comments