रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, आता लवकरच मिळणार 'या' सुविधा
मुंबई | जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता रेशन दुकानात चहा, कॉफी, साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर आणि शाम्पूही मिळणार आहे. राज्यातील 52 हजार दुकानदारांना या वस्तूंची विक्री करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. आतापर्यंत गहू, तांदूळ, तेल आणि साखर या गोष्टी खरेदी करता येत होत्या.
मात्र आता रेशन दुकानांतून खुल्या बाजारातील अंघोळ आणि धुण्याचा साबण, डिटर्जंट पावडर, शाम्पू, चहा-कॉफी विकता येईल. या वस्तू दुकानदारांनी स्थानिक पातळीवर स्वत: खरेदी करायच्या आहेत. त्याकरिता थेट कंपनीशी दुकानदारांनीच बोलायचे आहे. बाजार दरानुसार या वस्तू स्वस्त धान्य दुकानातून विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी अस्थायी स्वरूपात देण्यात आली आहे. यातून मिळणाऱ्या नफ्यावर शासनाचा हस्तक्षेप राहणार नाही. हा नफा थेट विक्रेत्यांना घेण्याची मुभा आहे. राज्यातील अन्न-नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने काल मान्यता दिली. त्याचबरोबर सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात होणाऱ्या बदलात समावेश होण्याची शक्यता विभागाने स्पष्ट केली आहे.
विक्रेत्यांनी दिला बंदचा इशारा
रेशन दुकानदारांना मिळणारे कमिशन परवडणारे नाही. ते दिल्ली आणि तामिळनाडूप्रमाणे मिळावे, अशी मागणी राज्यातील दुकानदारांची आहे. कमिशन वाढवून द्यावे आणि मोफत धान्य वितरणातील मूळ रक्कम आणि कमिशन अदा करावे, यासाठी 1 डिसेंबरपासून रेशन दुकानदार संप करणार आहेत.
0 Comments