google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, या पार्श्‍वभूमीवर दोन ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.

Breaking News

मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, या पार्श्‍वभूमीवर दोन ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.

मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, या पार्श्‍वभूमीवर दोन ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.


सोलापूर : कोरोनाची  दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांमधील बेशिस्तपणा वाढला आहे.

मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, या पार्श्‍वभूमीवर दोन ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे  नियोजन केले जात आहे. त्यांना कोवॅक्‍सिन  व झायडस कॅडिला  लस  टोचली जाणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. परंतु, अजूनपर्यंत परवानगी मिळाली नसून साधारणपणे जानेवारीपासून या वयोगटातील मुलांना लस टोचली जाईल, अशी माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिली.


कोरोनामुक्‍त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 18 वर्षांवरील सर्वांना प्रतिबंधित लस मोफत टोचली जात आहे. कोवॅक्‍सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा तर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना 84 दिवसांनंतर दुसरा डोस टोचला जातो. लस घेतल्याचा सकारात्मक परिणाम समोर आला असून, त्यासाठी पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नगर, नागपूर यासह अन्य जिल्ह्यांमध्ये सिरो सर्वेदेखील करण्यात आला. लस घेतलेल्या व न घेतलेल्यांमधील रोगप्रतिकारक शक्‍तीचा अंदाज घेण्यात आला. पॉझिटिव्ह तथा कोरोना मृतांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या खूपच कमी असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर आता दोन ते 17 वयोगटातील मुला-मुलींनाही लस टोचण्याचे नियोजन केले जात असून, परवानगीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. या वयोगटातील मुलांच्या नोंदीसाठी केंद्राला 'कोविन' ऍपमध्ये फेरबदल करावा लागणार आहे. त्याचे काम सुरू असून काही दिवसांत परवानगी मिळेल, असा विश्‍वास डॉ. ओक यांनी यावेळी व्यक्‍त केला. 2 ते 17 वयोगटातील मुलांना 28 दिवसांच्या फरकाने कोवॅक्‍सिनचे दोन डोस टोचले जातील. झायडस कॅडिला लसीचाही कालावधी तेवढाच राहणार आहे.

टास्क फोर्सचे निरीक्षण...

राज्यातील बहुतेक लोक कोरोना गेल्याच्या समजुतीतून प्रतिबंधित लस घेत नाहीत बाजारपेठांमधील गर्दी वाढली असून त्या ठिकाणी कोरोनासंबंधीचे नियम पाळले जात नाहीत गर्दीत जाणाऱ्यांकडे मास्क दिसत नाहीत; मास्क अन्‌ लसीकरणामुळे तयार होईल सामूहिक रोगप्रतिकारक शक्‍ती


मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची येऊ शकते तिसरी लाट; 2 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या परवानगीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

नियमांचे पालन अन्‌ लसीकरणाची आवश्‍यकता

कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, त्यामुळे सर्वांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागेल. कोरोनावरील प्रतिबंधित लस सर्वांनी टोचून घ्यावी. दोन ते 17 वयोगटातील मुलांसाठी जानेवारीपासून लसीकरण सुरू होऊ शकते. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, टास्क फोर्स, महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments