तुमच्याकडे फोन , फ्रीज , दुचाकी असेल तर आता मिळणार नाही स्वप्नातील घरकूल !
सोलापूर घरात लँडलाईन फोन , फ्रिज आहे काय ?, अहो साधी दोन चाकी गाडी असेल किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची मासिक मिळकत १० हजार रुपये असेल तरीही तुम्ही घराला मुकणार आहात . घरांसाठी सर्वेक्षणानंतरच्या " ड " याद्यांमधून पात्र ठरविण्यासाठी तब्बल २३ निकषांची चाळणी होणार आहे . क्षेत्रीय अधिकारी यादीतील प्रत्येक कुटुंबाची तपासणी करणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले घर मिळणे दिव्यस्वप्न ठरते की काय ?,
असे दिसत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबांना घर देण्याची घोषणा केली आहे . या अगोदर गरीब कुटुंबांना घर , अल्पदरात धान्य व इतर योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण करून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची पात्र यादी तयार केली जात असायची . या यादीतील कुटुंबांनाप्राधान्यक्रमाने घरकुल मंजूर केले जाते . आजही केंद्रातील काँग्रेस सरकारच्या कालावधीत तयार झालेल्या पात्र यादीतील कुटुंबांना घरे दिली जात आहेत . आता या यादीतील पात्र कुटुंबांना डिसेंबरपर्यंत घरे पूर्णकरण्याच्या सूचना आहेत .
पुढील वर्षीपासून घरे देण्यासाठी दोन वर्षांखाली ग्रामपंचायतीमार्फत कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते . या सर्वेक्षणातून तयार झालेल्या याद्यांना " ड " नावाने ओळखले जाते . या याद्यांचीअगोदर चाळणी करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समितीत कुटुंबसंख्या कमी करण्यात आली आहे . आता त्यालाही लावण्यासाठी तपासणी अधिकारी नेमले आहेत .

0 Comments