google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हयातून 'लाळ-खुरकत' रोग हद्दपार करण्याचा निर्धार

Breaking News

सोलापूर जिल्हयातून 'लाळ-खुरकत' रोग हद्दपार करण्याचा निर्धार

 सोलापूर जिल्हयातून 'लाळ-खुरकत' रोग हद्दपार करण्याचा निर्धार


सोलापूर - सोलापूर जिल्ह्याकरिता सव्वा लाख लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लस प्राप्त झाल्या असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे यांनी दिली. 


सोलापूर जिल्ह्यातील जनावरामधील लाळ-खुरकत या साथीच्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र शासनाने सन 20-21 पासून केंद्र पुरस्कृत योजना चालू केली आहे. या योजनेअंर्तगत सोलापूर जिल्ह्यातील गाय वर्गीय व म्हैस वर्गीय जनावरांना लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लस टोचण्यात येते. योजनेअंर्गत लसमाञा या केंद्र शासनाकडून खरेदी करुन राज्य शासनामार्फत पुरवठा केल्या जातात. लसिकरणासाठी आवश्यक असणा-या  चा पुरवठा राज्य शासनाकडून केला जातो. सदर योजनेचा पहिला टप्पा सन 20-21 पुर्ण करण्यात आला आहे.


सदर मोहिमेच्या दुसऱ्या टप्यासाठी ३० आॅक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याकरिता 12 लाख 41 हजार 850 लसी प्राप्त झाले आहेत. लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लसी जिल्ह्यातील जनावरांना टोचणेत येणार आहेत. प्राप्त झालेल्या लस जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय सोलापूर यांचेकडून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेमार्फत त्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यामधील सर्व 11 तालूक्यांना वितरीत करण्यात आल्या आहेत.


तालूक्यास प्राप्त झालेल्या लसमाञाचे वितरण पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती सर्व यांचेकडून त्याच दिवशी दवाखाना स्तरावर झाले आहे.दिं .1 नोव्हेंबर पासून राज्य स्तरीय 6 पशुवैद्यकीय संस्था व जिल्हा परिषदेकडील 203 पशुवैद्यकीय संस्था मार्फत जनावरांना लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लसमाञा टोचण्याचे काम चालू आहे. आजअखेर जिल्ह्यामधील 38 हजार 137 जनावरांचे लसी करण झाले असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सांगितले. सर्व शेतकरी बांधवांनी गाय व म्हशींना लसीकरण करावे असे आवाहन करणेत येत आहे.

Post a Comment

0 Comments