google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर सोलापुरात एका मेळाव्यात तरुणाने फेकले काळे ऑईल

Breaking News

माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर सोलापुरात एका मेळाव्यात तरुणाने फेकले काळे ऑईल

 माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर सोलापुरात एका मेळाव्यात तरुणाने फेकले काळे ऑईल



सोलापूर: सोलापूर येथे हिराचंद नेमचंद वाचनालयातील ॲम्फी थिएटरमध्ये झालेल्या राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्या मेळाव्यामध्ये काही तरुणांनी गोंधळ घातला.राष्ट्रीय चर्मकार संघटनेने हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात एका तरुणाने शिवसेना माजी मंत्री तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते बबनराव घोलप यांच्या अंगावर काळे ऑइल फेकले.


संघटनेमध्ये झालेल्या स्थानिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे कळले आहे. या मेळाव्यात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, नगरसेविका संगीता जाधव, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग माजी सदस्या सुरेखा लांबतुरे यांची घोलप यांच्यासह उपस्थिती होती. बबनराव घोलप यांनी लांबतूरे दाम्पत्याला पुन्हा संघटनेत समाविष्ट केले आहे. संघटनेचे नेते अशोक लांबतुरे व त्यांच्या पत्नी सुरेखा यांच्या छळाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. 


शिंदे यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला गेला. परंतु त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. घोलप यांनी या दाम्पत्याला संघटनेत पुन्हा सामील केल्याने शिंदे कुटुंबीयांनी याचा विरोध केला. वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करत आषाढी वारीसाठी परवानगी द्या, माजी मंत्री लोणीकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र या कारणास्तव संघटनेच्या मेळाव्यास शिंदे यांची मुले युवराज शिंदे व धनराज यांनी गोंधळ घातला. घोलप यांच्या अंगावर काळे ऑईल फेकून परत सोलापुरात आल्यास कपडे फाडून टाकू अशी धमकी या दोघा तरुणांनी दिली. या घटनेचा तणाव निवळल्या नंतर मात्र मेळावा सुरक्षितपणे पार पडला.

Post a Comment

0 Comments