सोलापूर ब्रेकिंग! SRPF जवानाचा सासरवाडीच्या लोकांवर गोळीबार; एकाचा जागीच मृत्यू -
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील भातंबरे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका SRPF च्या जवानाने आपल्या सासुरवाडीच्या लोकांवर गोळीबार केला आहे.या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य एका तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे .पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून आरोपी जवानाने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.
नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो आरोपी जवानाच्या मेहुण्याचा मित्र होता. तर गोरोबा महात्मे असं अटक केलेल्या आरोपी जवानाचं नाव आहे. तो बार्शी तालुक्यातील भातंबरे येथील रहिवासी असून सध्या मुंबईत कार्यरत आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.ही गोळीबाराची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी जवान गोरोबा महात्मे याचा हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होता. पत्नीचा बाहेर कोणासोबत तरी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय आरोपी जवानाला होता.

0 Comments