google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी सांगोला तालुक्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता

Breaking News

मोठी बातमी सांगोला तालुक्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता

 मोठी बातमी सांगोला तालुक्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता


प्रफुल्ल कदम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विद्यामंदिर प्रशालेत सांगोला साखर कारखान्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक शिल्लक राहणाऱ्या जमीनीवर औद्योगिक पार्क उभारण्याचा आराखडा,शेअर्स भरलेल्या सभासदांचे पैसे, कोळा, घेरडी भागातील ऊसाचे नियोजन,आदी मुद्द्यावर होणार चर्चा


प्रा.पी. सी. झपके,बाबुराव गायकवाड,शिवाजीराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार....


पंधरा वर्षे बंद पडलेला साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रफुल्ल कदम यांनी पुढाकार घेतल्यावर आणि पाठपुरावा केल्यावर राज्यातील प्रमुख नेत्यांना आणि राज्य सहकारी बँकेला गांभीर्य लक्षात येऊन त्यांनी सांगोला साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालू करण्याचा निर्णय घेतला. तथापि 174 एकर जमिनीपैकी साखर कारखाना चालविण्यासाठी लागणाऱ्या जमीनी व्यतिरिक्त शिल्लक राहणारी तब्बल 100 एकर जमीन खाजगी उद्योजकाला बक्षीस म्हणून न देता सांगोला तालुक्यासाठी औद्योगिक पार्क उभा करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव प्रफुल्ल कदम यांनी यापूर्वीच शासनाला आणि राज्य सहकारी बँकेला सादर केला आहे. 


प्रफुल्ल कदम यांचा हा प्रस्ताव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा असून यामुळे साखर कारखाना कर्जमुक्त होण्यासाठीही खूप मोठी मदत होणार आहे.यासंदर्भात सोमवारी सायंकाळी चार वाजता विद्यामंदिर प्रशालेत बैठक होणार असून या बैठकीत शेअर्स भरलेल्या सभासदांचे पैसे, कोळा, घेरडी भागातील ऊसाचे नियोजन,औद्योगिक पार्क उभारण्याचा आराखडा आदी इतरही महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.या बैठकीस प्रा. पी सी झपके,बाबुराव गायकवाड शिवाजीराव गायकवाड आदी मान्यवरांसह कारखाना बचाव समितीचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या बैठकीतून तालुक्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


"इतक्या वर्षे बंद पडलेला कारखाना सुरु करण्यासाठी प्रफुल्ल कदम यांनी बचाव समिती स्थापन केली. अत्यंत अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला त्यामुळे राज्य सहकारी बँकेला आणि राज्याच्या नेत्यांना हा कारखाना भाडेतत्त्वावर देता आला आहे. याचे श्रेय प्रफुल्ल कदम यांचे आहे. आमचा कारखाना चालवण्याला विरोध नाही परंतु प्रफुल्ल कदम यांनी सादर केलेल्या प्रस्ताव बँकेने व शासनाने मान्य केला पाहिजे.अन्यथा यात भ्रष्टाचार झाला आहे हे उघड होईल."

रविंद्र कांबळे (संचालक,सांगोला साखर कारखाना बचाव समिती )

Post a Comment

0 Comments