google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक : सांगोला भूमी अभिलेख विभागाने केला “हा” घोटाळा : मोहसिन मुलाणी

Breaking News

धक्कादायक : सांगोला भूमी अभिलेख विभागाने केला “हा” घोटाळा : मोहसिन मुलाणी

 धक्कादायक : सांगोला भूमी अभिलेख विभागाने केला “हा” घोटाळा : मोहसिन  मुलाणी


सांगोला (निखिल काटे) : येथील भूमी अभिलेख विभागाने मालमतेच्या नोंदी संदर्भात घोटाळा केल्याचं उघडकीस आले आहे. भूमी अभिलेख कार्यालय सांगोला येथील सि.स.नं. 1975 चे क्षेत्र 48.20 चौरस मिटर अशी प्रॉपर्टी कार्डवरती नोंद असताना या मिळकतीमध्ये भूमी अभिलेख कार्यालयामधून बेकायदेशीर प्रॉपर्टी कार्डावरती खाडाखोड करून 48.20 चौरस मीटर क्षेत्राची नोंद असताना कार्यालयामधील संबधित अधिकारी, कर्मचारी, व बाहेरील काही दलाल यांनी संगणमत करून सांगोला भूमी अभिलेख कार्यालयामध्ये असलेल्या सि.स.नं. 1975 प्रॉपर्टी कार्डाचे अनाधिकृतपणे खाडाखोड करून 48.20 चौरस मिटर असलेले क्षेत्राचे 78.20 चौरस मिटर क्षेत्र अशी नोंद भूमि अभिलेख कार्यालयामध्ये झाल्याची माहिती मोहसिन मुलाणी यांनी दिली आहे.



सांगोला भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व बाहेरील दलाल यांच्याकडून शासनाची व नगरपालिकेची फसवणूक झालेली आहे. तरी या गंभीर विषयांचे तात्काळ योग्य ती चौकशी होवून कार्यालयामधील या फसवणुकीसंबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. यासंदर्भात गंभीर दखल घ्यावी यासाठी वरिष्ठ अधिकारी सोलापूर कार्यालय यांच्याकडे व संबंधित कार्यालय पुणे यांच्याकडे मोहसिन मुलाणी यांनी तक्रार दाखल केली आहे.ही एक शासनाची मोठी फसवणूक केल्याची घटना सांगोला भुमी अभिलेख कार्यालयामध्ये उघडकीस आली आहे.

Post a Comment

0 Comments