google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! झारखंडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर १० युवकांचा बलात्कार

Breaking News

धक्कादायक ! झारखंडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर १० युवकांचा बलात्कार

 धक्कादायक ! झारखंडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर १० युवकांचा बलात्कार


रांची : झारखंड येथील गुमला जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर दहा युवकांनी शुक्रवारी सामूहिक बलात्कार केला. दसऱ्यानिमित्त आयोजिलेल्या जत्रेसाठी गेलेल्या या मुली आपल्या भावाबरोबर घरी परतत असताना ही भीषण घटना घडली.या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


या दोन अल्पवयीन मुलींसोबत असलेल्या भावाला मारहाण करून युवकांनी पिटाळून लावले. त्यानंतर दोन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. या मुलींचे वय १४ व १५ वर्षे असे आहे. जोभीपाठ येथे दसऱ्यानिमित्त आयोजिलेल्या जत्रेला हजेरी लावल्यानंतर या दोन मुली आपल्या १९ वर्षे वयाच्या भावासोबत शुक्रवारी रात्री सात वाजता घरी परतत होत्या. त्यावेळी लोदा भागामध्ये या तिघांना १० युवकांनी वाटेतच अडविले व दोन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकाराची माहिती दोन मुलींच्या भावाने पोलिसांना दिली. पोलीस व स्थानिक गावकरी घटनास्थळी पोहोचेपर्यंत १० युवक तिथून पसार झाले होते. या दोन मुलींना त्या युवकांनी मारहाणही केली.

Post a Comment

0 Comments