मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या एका तरुणाने अकलूज येथील एका भाजी विक्रेत्या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली आहे.
दारू पाजून शिर केलं धडावेगळं; पत्नीशी प्रेमसंबंध ठेवल्याने मुंबई पोलिसाने गाठला क्रूरतेचा कळस
मुंबई, 19 ऑक्टोबर: मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या एका तरुणाने अकलूज येथील एका भाजी विक्रेत्या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली आहे. पत्नीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून आरोपी पोलिसानं क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपीनं पत्नीच्या प्रियकाराला मुंबईला बोलावून घेत, त्याला शुद्ध हरपेपर्यंत दारू पाजली. त्यानंतर आरोपी पोलिसाने धारदार चाकूने संबंधित भाजी विक्रेत्या तरुणावर वार कर त्याचं शीर धडावेगळं केलं होतं. त्यानंतर आरोपीनं मुंबईतील अँटॉप हिल परिसरात हा मृतदेह टाकून दिला होता. मृतदेहाचं शीर गायब असल्याने संबंधित मृतदेह कोणाचा याबाबत गूढ बनलं होतं. पण मृत व्यक्तीच्या गुडघ्यात बसवलेल्या प्लेटद्वारे तपास करत पोलिसांनी खूनाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी आरोपी पोलिसासह त्याच्या पत्नीला अटक केली आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. मोनाली गायकवाड आणि शिवशंकर गायकवाड अशी अटक झालेल्या आरोपी पती-पत्नीचं नाव आहे. तर दादा जगदाळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवासी आहे. दादा जगदाळे आणि मोनाली गायकवाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दादा हा मोनाली यांच्या माहेरचा रहिवासी आहे. पण मोनालीचं मुंबईतील शिवशंकर गायकवाड याच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतरही मोनाली दादाच्या संपर्कात होती. हेही वाचा- औरंगाबाद: अखेर 7 दिवसांनी राजन शिंदेचा मारेकरी सापडला; नेमकं काय घडलं त्या रात्री? बायको मोनाली सतत कोणाशी तरी मोबाइलवरून बोलते, याचा संशय शिवशंकरला आला होता. यातून मोनाली आणि शिवशंकर यांच्यात सतत वाद देखील होतं होता. दरम्यान आरोपी शिवशंकरने दादा जगदाळे यांना फोन करून मुंबईला बोलावून घेतलं होतं. 29 सप्टेंबर रोजी आरोपीनं दादाला शुद्ध हरपण्यापर्यंत दारू पाजली होती. त्यानंतर शुद्ध हरवलेल्या दादाची शिवशंकरने निर्घृण हत्या केली होती. आरोपीनं धारदार शस्त्राने दादा यांचं शीर धडावेगळं केलं होतं. हेही वाचा-दसऱ्याच्या दिवशीच एकुलता एक मुलगा बनला राक्षस; आईसोबतच्या कृत्यानं पुणे हादरलं! यानंतर आरोपीनं मृतदेहाचे तुकडे प्लॅस्टिकच्या बॅगेत भरून ही बॅग मुंबईतील अँटॉप हिल परिसरात टाकून दिली. तत्पूर्वी आरोपीनं सॅनेटायझर टाकून मृतदेह जाळ्याचा देखील प्रयत्न केला होता. अशा शीर नसलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर, परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण पोलिसांनी मृत तरुणाच्या गुडघ्यात बसवलेल्या प्लेट्सच्या अधारे मृताची ओळख पटवून खुनाचा उलगडा केला आहे. मृताच्या गुडघ्यात बसवलेली प्लेट्स कोणत्या कंपनीची आहे, हे कळाल्यावर पोलीस अकलूज येथील ऑर्थोपेडिक रुग्णालयापर्यंत येऊन पोहोचले. त्यानंतर हातावर 'दादा' असं टॅटूच्या अधारे पोलिसांनी मृताची ओळख पटवली. हेही वाचा-सायकल पार्क करण्यावरून राडा; शेजाऱ्याने डोक्यात दगड घालून केला रक्तरंजित शेवट याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवशंकरसह त्याची पत्नी मोनालीला अटक केली आहे. 22 ऑक्टोबर पर्यंत पोलिसांनी दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी शिवशंकर हा सायन विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील यांच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता. शिवाय अकलूज याठिकाणी कौटुंबीक हिंसाचाराचा एक गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे. या घटनेचा पुढील तपास अँटॉप हिल पोलीस व गुन्हे शाखेचं युनिट चार संयुक्तपणे करत आहेत.
0 Comments