google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बघा आता, पोरांच्या परिक्षा घेणाऱ्या शिक्षकांचीच परिक्षा होईना..! तिसऱ्यांदा पुढे ढकलली परिक्षा

Breaking News

बघा आता, पोरांच्या परिक्षा घेणाऱ्या शिक्षकांचीच परिक्षा होईना..! तिसऱ्यांदा पुढे ढकलली परिक्षा

 बघा आता, पोरांच्या परिक्षा घेणाऱ्या शिक्षकांचीच परिक्षा होईना..! 


तिसऱ्यांदा पुढे ढकलली परिक्षा

राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी  परिक्षेची तारीख तिसऱ्या वेळेस पुढे ढकलण्यात आली आहे. यावर या परिक्षेस बसु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. ३० ऑक्टोबर रोजी होणार असलेली ही परिक्षा आता २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यात ३० ऑक्टोबर रोजी देगलूर – बिलोरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असलेली ही परिक्षा अगोदर १० ऑक्टोबरला होणार होती. त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा आल्याने ही परिक्षा ३१ ऑक्टोबरला घेण्याचे ठरले. परंतू त्या दिवशीही आरोग्य विभागाची परिक्षा घेतली जाणार आहे, त्यामुळे टीईटीची परिक्षा ३० ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले. पण आता पु्न्हा एकदा ही तारीख बदलण्यात आली असून आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी होईल. राज्यात यापुर्वी आरोग्य विभागाच्या ऑनलाईन परिक्षेचा घोळ समोर आला होता. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परिक्षा ठेवल्या गेल्याचा प्रकारही झाला होता. आता टीईटी परिक्षेची तारीख तिसऱ्यांना बदलली गेली आहे. कोरोनानंतर बदललेल्या परिस्थितीत सध्या याकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नसले तरी यामुळे परिक्षार्थींचे मोठे नुकसान होत आहे.

Post a Comment

0 Comments