अन्यथा जिल्ह्यातील 'कोतवाल' 28 ऑक्टोबर पासून सामूहिक रजेवर......
सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेची बैठक गुरुवारी सोलापूर जिल्हा कोतवाल कर्मचारी समन्वय कार्यालयात बैठक संपन्न झाली, यावेळी संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले. कोतवाल कर्मचाऱ्यांची पदोन्नती करणे, शासन् निर्णय नुसार अमलबजावणी तात्काळ करणे, सेवा पुस्तक अद्यावत करणे, अर्जित रजा शिल्लक रक्कम देणे, सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे या संघटनेच्या प्रलंबित मागण्यांकडे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे यावेळी कृष्णा शिंदे राज्य सरचिटणीस, विठ्ठल गुरव जिल्हा अध्यक्ष, अनिल जाधव जिल्हा सचिव, राजु साठे जिल्हा कार्यध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष राहुल तोडकरी, भगवान पारशी, मसा साबळे, प्रल्हाद खरे, मलिनाथ बाळगी, कोषाध्यक्ष अवधूत पुजारी, संजय कुरघडे, नवनाथ इगोले ,बदेनवाज दफेदार, बसवत सुतार, भागवत चंदनशिवे, रवि देडे, रशीद शेख, शहाजी हुलगे, शिवाजी काळे, आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान 26 ऑक्टोबर 2021 पर्यत मागण्या मान्य न झाल्यास 27 ऑक्टोबर 2021 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन, 28 ऑक्टोबर 2021रोजीपासून जिल्ह्यातील सर्व 547कोतवाल कर्मचारी सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
कार्यालयात झालेल्या बैठकीला धानय्या हिरेमठ तालुका अध्यक्ष दक्षिण सोलापूर, गौतम ठोकळे अध्यक्ष सागोला, महादेव खिलारे, बंडु खिलारे पढरपुर, इरणा कांबळे मगळवेढा अध्यक्ष, बंडु मडवळकर अध्यक्ष उत्तर सोलापूर, शफीक वाडीकर अध्यक्ष अककलकोट, अनिल भोसले करमाळा, समाधान सुर्यसुंगध सचिव सागोला, दत्ता कदम सचिव दक्षिण सोलापूर, श्रीशैल हकके कार्यअध्यक्ष, दिलावर वाघमारे, बी एस ,सय्यद उपाध्यक्ष माढा, बाळासाहेब खेदाड, सज्जन शिंदे, कुभार, रशीद शेख, राजु गुजले, हणमंत सानप, फिरोज तांबोळी, दौला कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते,
0 Comments