धक्कादायक ! एसटी बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या , प्रचंड खळबळ
संगमनेर : येथील बस चालकाने एसटीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये घडला आहे.सुभाष तेलोरे असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (21 सप्टेंबर) रोजी पहाटे 6.30 च्या सुमारास घडली असावी अशी माहिती समोर येते.
पाथर्डी -नाशिक या बसचे ते चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्यानं नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेतला. एसटी चालक सुभाष तेलोरे हे कोल्हार तालुक्यातील पाथर्डी येथील निवासी असून ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
0 Comments