सांगोला ( माळवाडी ) शहरात शेकापच्या बालेकिल्ल्याला खिंडार ; शेकडो तरुण कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहरातील माळवाडी म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून परिचित होता . आज त्या बालेकिल्ल्यात एकापाठोपाठ एक अशा क्रमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश होत असताना काल शनिवारी माळवाडी येथील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक शिवाजीनाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मा . आम . दिपकआबा साळुखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला . यावेळी पन्नास वर्षाची वहीवाट बाजूला काढून , एका रात्रीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परिवर्तन घडवू शकते . हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दाखवून दिले आहे .
जिकडे राष्ट्रवादी तिकडे विजयाचा गुलाल हे सबंध तालुक्याला माहिती आहे . त्यानिमीत्ताने परिवर्तनाची आणी क्रांतीची ज्योत पेटवायची ठरवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या माळवाडी येथील बहाद्दर कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत आहे .माळवाडीतील कार्यकर्त्याच्या पायाला काटा टोचला तर साळुखे - पाटील कुटुंबियांना रक्त आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मा . आम . दिपकआबा साळुखे - पाटील यांनी माळवाडी येथील कार्यकर्त्यांना दिला . माळवाडी सांगोला येथील पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तानजीकाका पाटील , गटनेते सचिन लोखंडे , मा . नगरसेवक नाथामालक जाधव , मा . नगरसेवक शिवाजीनाना बनकर , मा . नगरसेवक विजय राऊत , मा . नगराध्यक्ष अनिल खडतरे , युवक नेते मधुकर बनसोडे , माळी महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ राऊत , नगरसेवक सतीश सावंत , मा . नगरसेवक चंदन होनराव , दिलीपकाका मस्के , जेष्ट नेते राजेंद्र पाटील , उद्योगपती आनंद घोंगडे , चंचल बनसोडे ,
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष दामोदर साठे , विनोद रणदिवे , अजित गोडसे , चंद्रकांत सागर , पोपट खाटीक , बाळासाहेब जाधव , विष्णू जाधव , ग्रा . प . सदस्य नितीन वसेकर , आशिष म्हेत्रे , गजेंद्र जाधव , पिराजी जाधव आदी उपस्थित होते . यावेळी मा.आम दिपकआबा साळुखे पाटील म्हणाले , सांगोल्यात ज्या ज्यावेळी परिवर्तन घडले आहे त्या त्यावेळी या इतिहासात तरुणांनी मोठा सहभाग घेतला आहे . त्याच पद्धतीने आज तरुणांची क्रेझ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीकडे वळताना दिसून येत आहे . तसेच माळवाडी येथील नेते मंडळींनीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांचा तालुक्याच्या डोक्यावर हात सांगोल्याला मिळाला तेव्हा तालुक्यात परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली . माळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ज्यावेळी पहिला प्रवेश झाला ,
त्यावेळी विरोधी पक्षाकडून या प्रवेशाची चेष्टा केली . परंतु हीच चेष्टा आज बुरुज म्हणून ढासळत आहे . आणी आज हेच विरोधकांना वाईट वाटत आहे . मात्र शहरात परिवर्तनाची लाट येत आहे . याचा मनापासून आनंद होत आहे . आणि याची सुरुवात माळवाडी येथून होत असून पक्षप्रवेश या दरम्यान नागरिकांनी केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून या भागाला विकसित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाईल असेही मा.आम. दिपकआबा साळुखे पाटील यांनी सांगितले . आपल्या प्रस्ताविकातुन मा.नगरसेवक विजय राऊत म्हणाले , युवक प्रगतीचा खरा मेरू , त्या युवकांना संधी देण्याचा आणि युवकांना प्राधान्याने पुढे आणण्यासाठी प्रयत्न आहे . माळवाडी हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती , आता राष्ट्रवादी चा बालेकिल्ला म्हणून ओळख तयार करू , आणि माळवाडी परिसराचा विकास करू , असे त्यांनी सांगितले . यावेळी मा . नगरसेवक शिवाजीनाना बनकर म्हणाले , शेकाप पक्ष आता आम्ही निष्ठावंत नाही असे आरोप करत आहे , आम्ही पक्ष प्रवेश केल्यामुळे शेकाप पक्ष जागा झाला . घरोघरी भेटी सुरू झाल्या . 1990 पासून आबा शेकापच्या मागे भक्कम उभे होते . म्हणून विजय मिळवता आला . आज माघार घेतली आणि पराभव झाला . ही आबांची आणी राष्ट्रवादी ची खरी ताकद आहे . दिपकआबांनी कायम सहकार्याची वागणूक दिली . जे कामे घेऊन गेलो ती कामे आम्ही विरोधक असताना ही , आमची कामे केली .
त्यामुळे जयमालाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचा प्रवेश आणि आज डॉ . पियुषदादा साळुखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्ते यांचा प्रवेश केला . ही माळवाडी कडून वाढदिवसाची भेट असुन ,आबांच्या वाढदिवसाला माळवाडी हा प्रभाग राष्ट्रवादीमय करू असे त्यांनी सांगितले . यावेळी तानाजीकाका पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ राऊत यांनी केले . पक्ष प्रवेशामध्ये चंद्रकांत सागर , सुनील सागर , गौरव सागर , नितीन लिंगे , पवन माळी , नवनाथ लिंगे , कुलदीप बनकर , आकाश बनकर , संदीप बनकर , सोमनाथ लिंगे , आदेश लिंगे , प्रज्वल लिंगे , स्वप्नील माळी , प्रमोद सागर , शिवराम लिंगे , चंद्रकांत लिंगे , सावता लिंगे , राजू सागर , कुमार माळी , अशोक माळी , मधुकर लिंगे , प्रथमेश सतारले आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला .
0 Comments