google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तुम्हाला फायनान्स कंपन्यांचे लोक त्रास देतात का ? मग ' इथे ' करा तक्रार

Breaking News

तुम्हाला फायनान्स कंपन्यांचे लोक त्रास देतात का ? मग ' इथे ' करा तक्रार

 तुम्हाला फायनान्स कंपन्यांचे लोक त्रास देतात का ? मग ' इथे ' करा तक्रार


 तशा कंपन्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ . वैशाली कडूकर यांनी दिली .

सोलापूर: शहरात विविध प्रकारच्या फायनान्स कंपन्या आहेत.त्या कंपन्यांकडून सध्या कर्जदारांकडून कर्जाची वसुली सुरु आहे. मात्र, थकबाकीची वसुली करताना काही प्रकरणांमध्ये बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्‍तालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे तशा कंपन्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.


शहरातील अनेकांनी विविध फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून वाहने व काही वस्तू खरेदी केल्या आहेत. वाहन व वस्तू खरेदीसाठी काहींनी फायनान्स कंपन्यांकडून कर्जही घेतले आहे. कर्जाच नियमित हप्ते भरूनही पैशांसाठी तगादा लावला जात आहे. काही फायनान्स कंपन्यांनी कर्जदाराकडील वाहने व वस्तू काढून घेतल्याच्याबद्दल तक्रारी आहेत. त्या पिडित व्यक्‍ती तथा महिलांनी जवळील पोलिस ठाण्यात निर्भयपणे तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ. कडूकर यांनी केले आहे. अडचणीतील कर्जदारांना नाहक त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. काही फायनान्स कंपन्यांनी त्रयस्थ व्यक्‍तींमार्फत वसुली सुरु केली असून त्यांच्याकडून शिवीगाळदेखील होत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. कडूकर यांनी नागरिकांना तसे आवाहन केले आहे.


पोलिस विभागाकडून तत्काळ कारवाई  फायनान्स कंपन्यांकडून ज्या कर्जदारांना त्रास देण्यात आला आहे अथवा ज्यांना नियमित हप्ते भरूनही नाहक त्रास दिला जातोय, त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर तत्काळ त्याची दखल घेतली जाणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी तशा तक्रारीची तत्काळ दखल घेऊन अॅक्‍शन घ्यावी, असे आदेश पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिले आहेत.


सावकारकी, जागा खरेदी-विक्रीतही फसवणूक

सोलापूर शहरातील गुन्हेगारी वेगवेगळ्या पध्दतीची असल्याचा अनुभव आता पोलिसांना आला आहे. अवैध खासगी सावकारकीच्या माध्यमातून गरजूंना तब्बल 10 ते 20 टक्‍के व्याजदाराने पैसे दिले जातात. दुसरीकडे त्यांच्याकडून कोरे धनादेश व बॉण्ड घेतले जातात. जागेचा विकास करण्याचे कारण सांगून, बनावट कागदपत्रे देऊन जागा बळकावण्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शहर पोलिस आयुक्‍तालयाने पिडितांना तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. आता फायनान्स कंपन्यांच्या बाबतीत आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments