दुष्काळी तालुकाही ओळख मिटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - आ.पाटील
महुद / प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील प्रत्येक बाँचत गावात शेतीचे पाणी पोहोचवून पिढ्यान्पिढ्या दुष्काळी तालुका ही सांगोला तालुक्याची ओळख मिटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही , असे विचार आमदार शहाजी पाटील यांनी बोलताना व्यक्त केले
उजनी धरणातून सांगोला तालुक्यातील वंचित बारा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सुधारित सांगोला उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ शनिवारी लोटेवाडी येथे आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते झाला . पडत्या पावसात आ . पाटील व इतरांनी या योजनेचे उद्घाटन केले . अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक साळुखे होते . यावेळी बोलताना आ . पाटील यांनी सांगितले की , सन १ ९९ ५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगोला विधानसभा मतदार संघाकरिता उजनी धरणातून ३.८१ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले होते .
सन २००० मध्ये या योजनेला प्रशासकीय मान्यताही मिळाली होती . मात्र पराभवामुळे या योजनेचा पाठपुरावा झाला नाही . त्यामुळे सन २००५ मध्ये योजना रद्द झाली . त्यातच तेव्हा पाठपुरावा केलेल्या टेंभू योजनेच्या कार्यक्षेत्रात अनेक गावे आली व त्याचा प्रत्यक्ष लाभही मिळू लागला . त्यामुळे पुन्हा ही सांगोला | उपसा सिंचन योजना धोक्यात आली . मात्र , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तालुक्यातील वंचित १२ गावांचा पाणीप्रश्न लावून धरल्याने त्यांनी या योजनेस मंजुरी देऊन सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत . सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून त्यास निधी उपलब्ध करून घेऊन कार्यक्रमात बोलताना आमदार शहाजी पाटील . ही योजना लवकरच कार्यान्वीत केली जाईल . पाणी हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .माजी आ . दीपक साळुखे बोलताना म्हणाले , शहाजी पाटील हे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे नेतृत्व आहेत . तालुक्यातील कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू .
या कार्यक्रमात शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर , शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे , जिल्हा परिषद सदस्य गोविंद जरे , सागर पाटील , माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ , पंचायत समिती सदस्य रूपाली लवटे , राजेंद्र मेटकरी , वंदना गायकवाड , सुभाष इंगोले , शिवसेना तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भोरे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे , दादा लवटे यांच्यासह शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते व बारा गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते .
0 Comments