तिकीटाची अपेक्षा असल्यास पक्षाला देणगी द्या ; काँग्रेसचं पत्र व्हायरल
निवडणूक लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा काळाबाजार केला जातो. अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आमदारकीचं तिकीट घेण्यासाठी इच्छुक असल्यास पक्षालाच पैसे द्यावे लागणार असल्याचे चित्र काँग्रेमध्ये तयार झाल्याचं दिसतं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये २०२२ साली विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असल्याचे पाहायला मिळता आहेत. त्यातच आता काँग्रेसचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतं आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष अजय कुमार लल्लु यांनी पक्षाकडून तिकीटाची अपेक्षा असल्यास पक्षाला ११,००० रुपयांची देणगी दिल्याचा डिमाण्ड ड्राफ्ट आपल्या अर्जासोबत जोडावा असे अशी सुचना केली आहे काँग्रेस कमीटीच्या पत्रात स्पष्टपणे उल्लेख केला गेला आहे की, आपल्या अर्जासह पक्षाच्या अधिकृत लोकांकडे जमा करावा. तसेच पैसे भरण्यासाठी बँक खात्याचे तपशील सुद्धा या पत्रावर देण्यात आले आहेत.
0 Comments