... अन् घरभर पडला रक्ताचा सडा ; मुंबईत दिव्यांग पतीनं झोपलेल्या पत्नीला दिला भयंकर मृत्यू
मुंबई चांदिवली परिसरात एका दिव्यांग व्यक्तीनं आपल्या पत्नीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . मृत महिला घरात झोपलेली असताना दिव्यांग पती रांगत रांगत तिच्याजवळ गेला . यानंतर तिच्यावर चाकूनं सपासप वार आहेत . या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे . हत्येनंतर घरातील अवस्था पाहून पोलिसही हादरले आहेत . आरोपीनं अत्यंत भयंकर पद्धतीनं आपल्या पत्नीची हत्या केली आहे . या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत . शंकर त्रिमुखे असं आरोपीचं नाव असून ते मुंबईतील चांदिवली परिसरात वास्तव्याला आहे . पाच वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांनी दोन्ही पाय गमावले आहेत . तर कोंडाबाई त्रिमुखे असं हत्या झालेल्या 67 वर्षीय पत्नीचं नाव आहे . दोन्ही पाय गमावल्यानंतर आरोपी शंकरला नैराश्य आलं होतं . तसेच मागील काही काळापासून ते आजारीही होते . यातूनच त्यानं आपल्या पत्नीवर अशा प्रकारचा अमानुष हल्ला केला आहे . या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोंडाबाई यांनी बुधवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं . पण त्याच दिवशी उपचारादरम्यान त्याचं निधन झालं आहे . आधी भाची मग 21 वर्षीय आत्यासोबत घडलं विपरीत ; चौघांच्या कृत्यानं सातारा हादरलं लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार , 67 वर्षीय मृत कोंडाबाई ह्या बुधवारी रात्री आपल्या घरात झोपल्या होत्या . दरम्यान आरोपी शंकर हातात धारदार चाकू घेऊन रांगत रांगत पत्नीपर्यंत पोहोचला . यावेळी त्यानं पत्नीला काही कळायच्या आत तिच्या छातीवर , पोटावर आणि कंबरेवर धारदार चाकूनं सपासप वार केले . हा हल्ला इतका भयंकर होता की , कोंडाबाई यांच्या किंचाळ्या ऐकून त्यांची सूनही खडबडून जागी झाली . सासूसोबत घडलेला सर्व प्रकार सुनेनं आपल्या डोळ्यादेखत पाहिला . याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ... म्हणून कुटुंबातील सर्वांचा केला खेळ खल्लास ; हत्यारोपी मुलाचे धक्कादायक खुलासे पोलिसांनी घटनास्थळावरूनचं दिव्यांग आरोपी शंकर त्रिमुखेला अटक केली आहे . यावेळी पोलिसांना घरात सांडलेल्या रक्ताचे डाग आढळून आले आहेत . वृद्ध दाम्पत्यांमध्ये अनेकदा वाद व्हायचा . तसेच आरोपी शंकर त्रिमुखे याची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठिक नव्हती . त्यामुळे त्यांचं मानसिक स्थिती ढासळली होती . यातूनच त्यांनी आपल्या पत्नीची निघृण हत्या केली असावी , असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे . या घटनेचा पुढील तपास पवई पोलीस करत आहेत
0 Comments