सांगोला तालुक्यात 15 हजार पहिल्या व दुसऱ्या डोसच्या लसीचे नियोजन : वैद्यकीय अधिकारी सीमा दोडमनी
आज शनिवारी तालुक्यात मेघा कोरोना लसीकरण मोहीम १८ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना मिळणार कोरोना लस
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहरासह तालुक्यात लसीकरण केंद्रावर आज शनिवारी मेघा कोरोना लसीकरण होणार आहे . कोविशिल्ड लसीचा पुरवठा भरपूर प्रमाणात होणार असून सांगोला शहरातील १८ वर्षावरील नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये लससाठी रजिस्टर करावे व रजिस्टर केल्यानंतर येणारा रेफरन्स आयडी चे शेवटचे चार अंक , रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर व आधार कार्ड किंवा ( रजिस्ट्रेनशन करताना वापरलले ओळखपत्र ) सोबत घेऊन लसीकरण केंद्रावर गेल्यास प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे . सांगोला शहरासाठी
पु . अहिल्यादेवी होळकर सभागृह ( टाऊन हॉल ) येथे तर ग्रामीण भागात ६ आरोग्य केंद्र व ३ ९ आरोग्य उपकें द्र येथे लसिकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे . लसीकरणासाठी नोंदणी करताना अर्थात रजिस्ट्रेशन करताना शेड्युल मिळत नाही . सध्या तरी शेड्युलची गरज नाही . रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त १ ते २ मिनिट वेळ लागु शकतो एका मोबाईल नंबर वरती ४ जणांचे रजिस्ट्रेशन होऊ शकते . तरी नागरिकांना आरोग्य विभाग व नगरपरिषदे मार्फत आव्हान करण्यात येथे की डोस पासून वंचित नागरिकांनी कोरोना लसीचे डोस घेण्यात यावेत . त्या अनुषंगाने आज शनिवारी मेघा लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून अठरा वर्षा पुढील सर्वच नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे .
0 Comments