फॉरेस्ट मधिल झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन निलंबित करावे : शंकर मेटकरीची मागणी
सांगोला / प्रतिनिधी : शिरभावी ता.सांगोला येथील फॉरेस्ट मधील अंदाजे १० ते १२ वर्षे जुनी लिंब व इतर जंगली जिवंत झाडांची बेकायदेशीररित्या जेसीबीच्या साह्याने वन विभागातील कर्मचाऱ्यांनी तोडणी केली आहे . सदर तोडणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे . अशी मागणी युवासेना सांगोला यांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्य वन संरक्षक प्रादेशिक पुणे संजय दोडल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील गट नंबर ७१ मध्ये वनीकरण केलेले असून , १० ते १५ वर्षांपूर्वीची सर्व झाडे जेसीबीच्या साह्याने काढून टाकलेली आहेत . झाडे काढताना कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही . याबाबत वेळोवेळी फोनद्वारे लेखी तक्रार देऊन देखील याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेले आहे .लिंब व इतर झाडे काढल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कोणालाही न कळता याचा परस्पर पंचनामा केला असून , तो पंचनामा न कळवता एक महिन्यानंतर खोट्या बातम्या वृत्तपत्रात दिल्या आहेत . सदर झाडे तोडून वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक यांनी विक्री केलेली आहे वन अधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यापासून असे प्रकार घडत आहेत . हा प्रकार युवा सेनेने उघडकीस आणला म्हणून युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबाव टाकून गाव गुंडांकडून अर्ज मागे घेण्यास दबाव टाकत आहेत . . सदर माहिती उपवन संरक्षक सोलापूरचे धैर्यशील पाटील यांच्याकडे २२ जून रोजी समक्ष भेटून झालेली घटना त्यांना सांगून निवेदन देण्यात आले होते त्याबाबतीत अद्याप कोणतीही कारवाई व न झालेली नाही ३ ऑगस्ट रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे प्रत्यक्ष पाहण्यासाठी शिरभावी फॉरेस्ट येथे हजर राहण्यास सांगितले होते . युवा सेनेचेपदाधिकारी कार्यकर्ते वेळेवर उपस्थित राहून सुद्धा तेथे कोणताही अधिकारी फिरकला नाही यावेळेस वनपरिक्षेत्र अधिकारी मोबाईल बंद करून बसले होते . वनरक्षक यांना त्या ठिकाणी पाठवून कारणे सांगून अर्ज मागे घेण्यास युवा सेनेवर दबाव टाकण्यात आला .तरी अशा गलथानपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे . अशी मागणी युवा सेनेच्या वतीने मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे संजय दोडल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . सदर निवेदन देतेवेळी युवा सेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी शिवसेना शाखाप्रमुख हलदहिवडी समाधान चव्हाण , युवा सेना तालुका प्रमुख सुभाष भोसले उपस्थित होते .
0 Comments