सांगोला नगरपरिषदेच्या वतीने मुकबधीर शाळा येथे खेळणी साहित्याचे वाटप
सांगोला/प्रतिनिधी :सांगोला नगरपरिषदेने काल भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगोला येथील मुकबधीर शाळेस खेळणीच्या साहित्याचे वाटप केले. यासाठी महिला व बालकल्याण समितीमध्ये विषय मंजूर करण्यात आला होता.
त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत त्याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अनुराधा खडतरे, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, नगरसेविका सौ. स्वातीताई मगर,
कार्यालयीन अधीक्षक आडसुळ मॅडम, पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने, लेखापाल जितेंद्र गायकवाड, कनेरी, शहर समनवयक शिवाजी सांगळे, कर अधिकारी स्वप्नील हाके, अभिलाषा निंबाळकर, इंजि. अमित कोरे, कोरे मॅडम, तेथील संस्थेच्या पाटील मॅडम, कांबळे सर तसेच इतर शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.
0 Comments