google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शाळा दिवाळीनंतर , महाविद्यालय मात्र .... ; अजित पवार

Breaking News

शाळा दिवाळीनंतर , महाविद्यालय मात्र .... ; अजित पवार

 शाळा दिवाळीनंतर , महाविद्यालय मात्र .... ; अजित पवार


 दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना टास्क फोर्सने केल्या आहेत. मात्र १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. अशी महाविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे.त्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.


राज्य सरकारने मध्यंतरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन दिवसात राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. या संदर्भात पवार यांचा विचाराले असता, ते म्हणाले,''शाळा सुरू करण्याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

ही शक्यता लक्षात घेऊनच टास्क फोर्सने दिवाळीनंतरच शाळा सुरू कराव्यात, अशी सूचना केली आहे. त्यामुळे शाळांबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच होणार आहे. मात्र महाविद्यालय सुरू करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. काही संस्थांचालक आणि पालक यांची देखील मागणी आहे.

 त्यामुळे १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच शिक्षक आणि अन्य महाविद्यालयीन कर्मचारी यांचे देखील लसीकरण पूर्ण झाले आहे. अशा महाविद्यालयांना सर्व नियम पाळून परवानगी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील'', असेही पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments