झिकाचा धसका: ग्रामपंचायतीनं गावभर वाटले ‘कंडोम’, पुढील 4 महिने लैंगिक संबंध टाळाण्याचाही दिला सल्ला…
पुणे जिल्ह्यात करोनाची परिस्थिती आता सुधारत आहे. मात्र झिका व्हायरसने आता डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्या प्रार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात झिकाचा पहिला रुग्ण हा पुरंदर तालुक्यात बेलसर या गावात मिळाला आहे. त्यामुळे या गावात आरोग्य यंत्रणांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.
झिका व्हायरसचा इतरांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. झिका व्हायरस हा लैंगिक संबंधाने पसरतो, पुरुषांच्या विर्यात झिका विषाणू आढळत असल्याने खबरदारी म्हणून ग्राम पंचायतकडून कंडोम चे वाटप करण्यात आले.पुरुषांच्या वीर्यात मोठ्या प्रमाणात झिका आढळत
असल्यामुळे लैंगिक संबंध टाळण्यासाठी हा प्रयत्न आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ७९ गावांत झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे. या गावांत अलर्ट जारी केली आहे. तसंच, स्थानिक प्रशासन व सर्व ग्रामपंचायत यांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या गावांची यादीही जाहीर केली आहे.या ७९ गावांत मागील तीन वर्षांपासून डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत.
ही गावे झिका व्हायरससाठी अति संवेदनशील आहेत. त्यामुळं गावातील लोक व अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबरोबर आरोग्य विभागाकडून पुढील किमान चार महिने गावातील महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे तसेच 4 महिने लैंगिक संबंध टाळाण्याही सल्ला देण्यात आला आहे. अथवा सुरक्षित पद्धतीने शरीरसंबंध ठेवावेत, असेही वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले आहे.
0 Comments