पत्रकार रविंद्र कांबळे व उमेश महाजन यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर.
सांगोला -(प्रतिनिधी) संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार सांगोल्याचे पत्रकार रविंद्र कांबळे व महूद चे पत्रकार उमेश महाजन त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे 25 जुलै रोजी महुद बुद्रुक येथील संत रोहिदास समाज मंदिर महुद बुद्रुक येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्रीदेवी जॉन फुलारे
(सोलापूर महानगरपालिका नगरसेविका ) प्रमुख पाहुणे
राजश्री पाटील
(डीवायएसपी ),
संगीता ताई धांडोरे
(समाज कल्याण सभापती सोलापूर जिल्हा परिषद ), प्रमुख उपस्थिती
अभिजीत पाटील
(तहसीलदार सांगोला ),
सुहास जगताप
(पोलीस निरीक्षक सांगोला ),
संतोष राऊत (गटविकास अधिकारी सांगोला ) , संजय( बाबा) शिंदे
(राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष ),अशोक लामतुरे(अश्विनी हॉस्पिटल सोलापूर संचालक),राहुल खाडे (उद्योगपती कोल्हापूर ),रामचंद्र कबाडे (युवा कार्याध्यक्ष प्रदेश राष्ट्रीय चर्मकार महासंघ.)संस्थापक अध्यक्ष गणेश कांबळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार रवींद्र कांबळे व पत्रकार उमेश महाजन यांच्यासह इतर मान्यवरांना देखील पुरस्कार देण्यात येणार आहेत.सांगोला तालुक्यातील सांगोला जनमत न्यूज हे सांगोला तालुक्यातील पहिले न्यूज चॅनल व न्यूज पोर्टल आहे डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सांगोला तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी अनेक दिवसांपासून सांगोला तालुक्यांमध्ये सामान्य माणसांच्या प्रश्नावर ती तसेच कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांची संख्या तसेच शासनाच्या सर्व नियमांची व योजनांची माहिती आपल्या बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल त्यांना कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच दैनिक सकाळचे पत्रकार महूद सारख्या ग्रामीण भागात देखील कोरोना कालावधीमध्ये निर्भीडपणे सामान्य नागरिकांना कोरोना बाबतची जनजागृती व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम उमेश महाजन यांनी देखील काम केल्यामुळे वरील दोन्ही पत्रकारांना संत रोहिदास बहुउद्देशीय सामाजिक संस्था महूद बु यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात येणार आहे वरील दोन्ही पत्रकारांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील पत्रकार विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे
0 Comments