google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आ.शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे बंधारे दुरुस्तीचा मार्ग मोकळा

Breaking News

आ.शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे बंधारे दुरुस्तीचा मार्ग मोकळा

आ.शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे बंधारे दुरुस्तीचा मार्ग मोकळा


 सांगोला (तालुका प्रतिनिधी) गतवर्षी अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील माण नदीवरील पाच बंधाऱ्याचे नुकसान झाले होते. पावसाळ्यापूर्वी संबंधित बंधारे तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली होती. आ.शहाजीबापू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे वाटंबरे, चिणके, बलवडी, सांगोला व सावे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून बंधारे दुरुस्तीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 2 कोटी 67 लाख 34 हजार रुपयांचे अंदाजपत्रक असून ई निविदा भरण्याची अंतिम मुदत 11 जूनपर्यंत आहे. गतवर्षी 15 व 16 ऑक्टोंबर रोजी सांगोला तालुक्यासह माण खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे माण नदीला पूर आला होता. पुराच्या प्रवाहामुळे नदीवरील बलवडी, चिणके, वाटंबरे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची भिंत पडून शेजारच्या शेतातील भरावा वाहून गेला. तर याच नदीवरील सांगोला व सावे येथील कोल्हापूर पद्धतीचे दोन बंधाऱ्याचा उजव्या बाजूकडील भरावा वाहून गेला होता. माण नदीवरील पुराच्या पाण्यामुळे एकाच वेळी 5 बंधाऱ्यांना भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊ लागल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी संबंधित बंधाऱ्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पाटबंधारे शाखा सांगोला यांच्यामार्फत बलवडी, चिणके, वाटंबरे, सांगोला, सावे या पाच बंधाऱ्याचे सर्वेक्षण करून अंदाजे दुरुस्तीचा प्रस्ताव मुख्य अभियंता विशेष प्रकल्प पुणे विभाग यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवून दिला होता.दरम्यान माण नदीवरील बंधारे तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे केली होती . शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी मदत व पुर्नवसन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला. आ.शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून वाटंबरे, बलवडी, चिणके, सांगोला व सावे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर यांनी बंधारे दुरुस्तीची निविदा प्रसिद्ध केली आहे. बलवडी व चिणके बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 93 लाख 11 हजार रुपये, सांगोला व सावे बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 5 लाख 67 हजार रुपये तर वाटंबरे व गुंजेगाव ता.मंगळवेढा या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे 71 लाख 40 हजार रुपयांचे अंदाजपत्रक असून ई निविदा भरण्याची 11 जूनपर्यंत आहे. तर 14 जून रोजी ई निविदा उघडण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments