google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोबाईल विक्रीच्या बहाणा करून मामाने केला भाच्याचा खुन..

Breaking News

मोबाईल विक्रीच्या बहाणा करून मामाने केला भाच्याचा खुन..

 मोबाईल विक्रीच्या बहाणा करून मामाने केला भाच्याचा खुन.. 


पुणेः  दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री एका अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आला . याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे . यातील एका आरोपीच्या भाच्याचा काही दिवसांपूर्वी आंबेगाव पठार परिसरात खून झाला होता . त्यातूनच मामाने व त्याच्या इतर साथीदारांनी मोबाईल विक्रीचा बहाणा करत कट रचून मुलाचा खून केला . सौरभ वाघमारे ( वय १७ , रा . जनता वसाहत ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहेविनोद वार , वृषभ दत्तात्रय रेणुसे , सोचन ऊर्फ दादा पवार , आकाश नावाडे , स्वामी कांबळे असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत . याबाबत दादासो मारुती बनसोडे ( २३ , रा . लक्ष्मी कॉलनी , हडपसर ) याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अटक केलेल्यांसह इतर जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , सौरभ वाघमारे याने एप्रिल महिन्यात आंबेगाव पठार येथे संग्राम लेकावळे याचा खून केला होता . त्याचा राग मनात धरुन आरोपींनी सौरभला मारण्याचा पुर्वनियोजित कट रचला . आरोपींनी सौरभला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करून पर्वती पायथा येथे बोलावून घेतले . वाघमारे सोबत फिर्यादी बनसोडे देखील होता . त्यावेळी सौरभ वीर , अक्षय वीर व वृषभ यांनी त्यांच्याकडील कोयत्याने सौरभआकाश वाघमारे याच्या डोक्यावर , पाठीवर व हातावर वार केले . तर सचिन पवार , नावाडे व त्यांच्या इतर साथीदारांनी सौरभला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सौरभचा जागीच मृत्यू झाला . दरम्यान , आरोपींनी सौरभच्या मदतीला स्थानिक नागरीकांनी येऊ नये , यासाठी आरोपी नागरीकांच्या अंगावर धावून गेले होते . आरोपींनी नागरीकांना ' इथून निघून जा नाहीतर तुम्हालाही मारुन टाकू ' अशी धमकी देत आरडाओरडा केला . दरम्यान , फिर्यादी हा ' सौरभला मारू नका , तो मरेल ' असे ओरडत असताना सौरभ वीर याने फिर्यादीच्या पाठीवर कोयत्याने वार केले . तर स्वामी कांबळे याने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने फिर्यादीही गंभीर जखमी झाला . फिर्यादीने याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली . त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीम्हणून केला खून लेकावळे व सौरभ वाघमारे हे दोघेही आंबेगाव पठार येथे राहात होते . सौरभ हा लेकावळेपेक्षा लहान होता . त्यामुळे लेकावळे त्यास किरकोळ कामे सांगणे , येता - जाता सौरभच्या डोक्यात टपली मारणे असे प्रकार करीत होता . त्याचा राग आल्याने सौरभने साथीदारांच्या मदतीने लेकावळेचा एप्रिल महिन्यात खून केला होता . या घटनेनंतर सौरभ जनता वसाहतीमध्ये राहण्यास आला . दरम्यान , लेकावळेचा मामा वृषभ रेणुसे याने अन्य साथीदार गोळा करून त्याच्या खूनाच्या बदल्यात सौरभचा खून केला . यासाठी आरोपींनी पुर्वनियोजीत कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे .

Post a Comment

0 Comments