विज्ञान महाविद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन
विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रघुनाथ फुले संस्था सदस्य डॉ अशोक रावजी शिंदे सर ज्येष्ठ प्रा राजेंद्र गायकवाड सोलापूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य नवनाथ कांबळे प्रा जालिंदर टकले प्रा चंद्रकांत इंगळे प्रा जालिंदर राऊत या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलेया प्रसंगी प्राचार्य डॉ रघुनाथ फुले व प्रमुख पाहुणे डॉ अशोकराव शिंदे यांनी राजमाता जिजाऊ यांचे चरित्र त्यांचे कार्य त्यांचे कार्यशाला व सर्वसमावेशकता याच्या विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा दीपक रिटे यांनी केले तर आभार नवनाथ कांबळे यांनी मानले कार्यक्रमाला उपस्थित धनंजय गायकवाड चंद्रकांत पवार वसंत घुसाळे निसार मुलानी बाळासाहेब पोळी सौ विमल माने व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला
0 Comments