उत्पादन शुल्क व पोलिसांची अजनाळेत संयुक्त कारवाई देशी विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त ; निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल
अजनाळे / सचिन धांडोरे : अजनाळे ग्रामपंचायत तसेच विष्णू देशमुख , हणमंत कोळवले , अमित शेंबडे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे व पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांना लेखी निवेदन देऊन अजनाळे गावातील बेकायदेशीर दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली होतीया मागणीची तात्काळ दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्क यांनी अजनाळे गावात संयुक्त कारवाई करीत ५६८० रुपयांचा देशी - विदेशी दारू जप्त केली . यावेळी बापु अंबादास चव्हाण हा आरोपी फरार आहे तर दयानंद अंकुश धांडोरे यांच्या वरती कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दुय्यम निरीक्षक डी.व्ही.शिंदे , पराडकर यांनी दिली . सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर , पोलीस पोहेकाँ कर्चे , पोहेकाँ बनसोडे , पोना मोरे असे मिळून दि . ११ रोजी नाझरा हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना अजनाळे गावात गोपनीय माहितीच्या आधारे दयानंद अंकुश धांडोरे हा बेकायदेशीरपणे दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती . याबाबत पोलिसांनी धाड टाकून त्याच्याकडून २३ देशी संत्रादारू च्या सीलबंद बाटल्या व विदेशी मद्याच्या १ ९ ०० रुपयांच्या बाटल्या आढळून आल्या . या घटनेची फिर्याद पोलीस कॉ . कुमार जाधव यांनी दाखल केली आहे . या घटनेचा पुढील तपास पो.कॉ. बनसोडे करीत आहेत . राज्य उत्पादन शुल्क व सांगोला पोलीस स्टेशन यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ५६८० रू मुद्देमाल जप्त केल्याबद्दल अजनाळे गावातून राज्य उत्पादन शुल्क व सांगोला पोलीस स्टेशन बद्दल समाधान व्यक्त होत असून सदर कारवाईमध्ये गावचे पोलीस पाटील संतोष भंडगे यांचे देखील मोठे सहकार्य लाभले .
0 Comments