एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार लवकरच होणार सरकारकडून ६०० कोटींची मदत
मुंबई : आर्थिक अडचणी मध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासन ६०० कोटी रुपयांची मदत देणार आहे . अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.यामुळे एसटीच्या ९ ८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे .अत्यावश्यक कोरोना महामारी मुळे राज्यात १५ एप्रिल पासून दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली . एसटीला केवळ सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त ५० टक्के आसन क्षमतेने बसेस चालू ठेवण्याचे बंधन घातले होते . त्यामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती . त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता.गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत तुटपुंजे उत्पन्न कसेबसे एसटी महामंडळाला मिळत होते.त्यामुळे दैनंदिन खर्च भागवने देखील एसटीला शक्य नव्हते . यासाठी मंत्री परब यांनी एसटी महामंडळातर्फे शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता . या बाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार , यांना करण्यात आले . त्यावेळी कर्मचा - यांचे वेतन व इतर दैनदिन खर्चासाठी ६०० कोटी रुपये
पहिल्या टप्यात देण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्य केले.त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे.या बैठकीला परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील , अर्थ व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव , परिवहन विभाचे अप्पर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते .
0 Comments