शनिवार व रविवार या 2 दिवशी दुकाने सुरू ठेवणे संदर्भात जाहीर आवाहन!!
सांगोले शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते कि, कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महाराष्ट्र शासन व मा.जिल्हाधिकारीसो सोलापूर यांनी दिनांक 05 जून 2021 रोजी जारी केलेल्या नियमावली नूसार सांगोला शहरात शनिवार,रविवारी केवळ हॉस्पिटल,मेडिकल,कृषी संबंधित सर्व दुकाने,किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने,हॉटेल ची पार्सल सुविधा, रस्त्यावरील हातगाडी यांची पार्सल सुविधा,पेट्रोल पंप संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.शहरातील इतर सर्व दुकाने 2 दिवस पूर्णतः बंद राहतील.अद्याप कोरोना चे संकट कायम असून सर्वांनी नियमांचे पालन करावे.
कैलास केंद्रे
मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद
0 Comments